32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रEknath Shinde : शिंदेंच्या हातून ढाल-तलवार निसटणार? शीख समाजाने घेतला चिन्हावर आक्षेप

Eknath Shinde : शिंदेंच्या हातून ढाल-तलवार निसटणार? शीख समाजाने घेतला चिन्हावर आक्षेप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ढाल-तलवार ही शीख धर्माच प्रतीक आहे असे म्हणत, सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रणजीत सिंह कामठेकर यांनी नांदेडच्या शीख समाजातर्फे निवडणूक आयोगाला निवेदन पत्र पाठवल आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि निवडणूक चिन्ह यावरून अनेक वाद सुरू आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या निर्देशानुसार अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीसाठी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोढवण्यास सांगितले. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाला शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाअंतर्गत मशाल हे चिन्ह देण्यात आले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेना नावाअंतर्गत ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं. आता सध्या दोन्ही चिन्हांवर आक्षेप घेण्याच्या कामांना सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ढाल-तलवार ही शीख धर्माच प्रतीक आहे असे म्हणत, सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रणजीत सिंह कामठेकर यांनी नांदेडच्या शीख समाजातर्फे निवडणूक आयोगाला निवेदन पत्र पाठवल आहे. त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच चिन्ह गोठवण्यात आल त्याचप्रमाणे ढाल-तलवार हे सुद्धा खालसा पंथाच प्रतीक आहे, त्यामळे निवडणूक आयोगाने हे चिन्ह द्यायला नको होत. याचा निर्णय झाला नाही तर रणजीत सिंह न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

T20 World Cup : वर्ल्डकप आधीची पत्रकार परिषद बाबर आझमने गाजवली! कर्णधार रोहित बाबत केलं मोठं विधान

Big Boss 16 : ‘मला शर्ट काढायला भाग पाडू नका’, बिगबॉसच्या सेटवर भाईजान भडकला! पाहा व्हिडिओ

INDvsPAK : अखेर 15 वर्षानंतर टीम इंडिया करणार पाकिस्तान दौरा! जाणून घ्या काय आहे विशेष कारण

उद्धव ठाकरे यांचा गटाला मिळालेल्या मशालीच्या चिन्हावर समता पक्षाने दावा केला आहे, तसाच एकनाथ शिंदेंच्या ढाल- तलवार चिन्हावर शीख समाजाने आक्षेप घेतला आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाला दिलेली चिन्हे वादात सापडली आहेत. सचखंड गुरुद्वाराचे सचिव रणजीत सिंह कामठेकर यांनी ढाल-तलवार हे खालसा समाजाच्या धार्मिक प्रतिका सारख हे चिन्ह दिसत असल्याने त्याचा वापर निवडणूकीच चिन्ह म्हणून करु नये अशी मागणी त्यांनी केली आहे. ह्या संदर्भात निवडणूक आयोगाला निवेदनही त्यांनी पाठवलं आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला आणि ठाकरे गटाला पक्षासाठी नवीन नाव आणि पक्षचिन्ह दिली गेली. त्याचप्रमाणे दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यास मनाई करत, शिवसेनेचे चिन्ह असलेले धनुष्यबाण देखील गोठवण्यात आले. उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव व मशाल चिन्ह म्हणून दिले गेले. तर बाळासाहेबांची शिवसेना हे एकनाथ शिंदेंच्या गटाला नाव देण्यात आले आणि ढाल-तलवार हे चिन्ह दिले गेले. शिंदे गटाला देण्यात आलेल्या चिन्हामध्ये दोन तलवारी आणि ढाल आहे. तळपता सूर्य हे चिन्ह शिंदे गटानं पहिल्या पसंतीस दिलं होतं. परंतु, निवडणूक आयोगानं हे चिन्ह शिंदे गटाला नाकारलं आहे. कारण तळपता सूर्य आणि उगवता सूर्य यामध्ये गोंधळ होऊ शकतो.याबरोबरच मिझोराम नॅशनल पक्षाचं देखील चिन्ह उगवता सूर्य हे आहे. त्याच बरोबर उगवता सूर्य हे पहिल्यापासूनच डीएमके पक्षाचं चिन्ह आहे. त्यामुळे शिंदे गटाला उगवता सूर्य हे चिन्ह नाकारण्यात आलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी