35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयदिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत        पाच वर्षात दुपटीने वाढ झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांच्या नावे एकूण ८३ लाखांची जंगम व स्थावर मालमत्ता होती. आता त्यांची संपत्ती दोन कोटी १३ लाखांवर जावून पोहोचली आहे. विशेष म्हणजे त्यांचे पती प्रवीण पवार यांच्याही संपत्तीत दुपटीने वाढ झाल्याचे डॉ.पवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून दिसून येते. अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत नऊ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth) पाच वर्षात दुपटीने वाढ (doubles in five years )झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांच्या नावे एकूण ८३ लाखांची जंगम व स्थावर मालमत्ता होती. आता त्यांची संपत्ती दोन कोटी १३ लाखांवर जावून पोहोचली आहे. विशेष म्हणजे त्यांचे पती प्रवीण पवार यांच्याही संपत्तीत दुपटीने वाढ झाल्याचे डॉ.पवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून दिसून येते. अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत नऊ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.(Dindori Lok Sabha candidate’s wealth doubles in five years )

यात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी गुरुवारी (ता.२) राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचा अधिकृत एबी फॉर्म जोडला. तर महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती प्रवीण पवार यांनी महायुतीतर्फे अर्ज सादर केला. अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती निवडणूक आयोगाला कळवली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी डॉ. भारती पवार यांची कौटुंबिक संपत्ती १३ कोटी रुपयांची होती. डॉ.पवार यांच्यानावे २०१९ मध्ये ५३ लाख ४२ हजारांची जंगम मालमत्ता होती. ती आता ६३ लाखांवर पोहोचली आहे. तर ३० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता २०२४ मध्ये दीड कोटी रुपयांवर जावून पोहोचली आहे. यात मखमलाबाद येथील प्लॉटचे बाजार मूल्य वाढल्याचे दिसून येते.

डॉ.भारती पवारांकडे साडेपाच लाखांचे ८० ग्रॅम सोने आहे. तर जवळपास दीड किलो चांदी (एक लाख आठ हजार रु.), सोळा लाखांच्या विविध बँकांमध्ये ठेवी, दहा लाखांची एलआयसी विमा त्यांच्या नावे आहे. बँक बडोदाचे नऊ लाखांचे शेअर्स त्यांनी घेतल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे त्यांच्या नावे एक रुपयांचेही कर्ज नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्याचे पती प्रविण पवार यांच्या नावे एक कोटी सहा लाखांची जंगम मालमत्ता तर १९ कोटी ३४ लाख ८१ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. यात विविध ठिकाणी खरेदी केलेला जागा, प्लॉट्स व वडिलोपर्जित संपत्तीचा समावेश आहे. प्रवीण पवार यांच्या नावे पावणे तीन लाखांचे कर्जही असल्याचे दिसून येते. दिंडोरी मतदारसंघात पल्लवी भास्कर भगरे यांनीही अर्ज सादर केला. त्यांच्या नावे १६ लाखांची चल संपत्ती आहे. तर अपक्ष उमेदवार बाबु भगरेंच्या नावे ७२ हजारांची चल व चार लाखांची अचल संपत्ती असल्याचे दिसून येते.

माजी खासदार चव्हाणांवर साडेसहा लाखांचे कर्ज
माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनीही आपला अर्ज दाखल केला. त्यांच्याकडे ६२ लाख ८५ हजारांची चल संपत्ती असून, यात ३८ ग्रॅम सोने, एक इनोव्हा कारचा समावेश आहे. एक कोटी ४६ लाखांची अचल संपत्ती त्यांच्या नावे असली तरी, सहा लाख ४० हजार रुपयांचे कर्जही दिसून येते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी