35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयनाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण सोळा कोटींची संपत्ती आहे. खासदार गोडसेंच्या नावे १३ कोटी ३८ लाखांची तर पत्नी अनिता गोडसेंच्या नावावर दोन कोटी ८२ लाखांची संपत्ती असल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. विशेष म्हणजे खासदार गोडसेंवर साडेपाच कोटींचे तर पत्नीच्या नावे एक कोटी पाच लाखांचे अर्ज असल्याचे दिसून येते. गेल्या पाच वर्षात खासदारांच्या संपत्तीत वाढ होण्याऐवजी अचल संपत्ती सव्वासहा कोटींवरुन सव्वापाच कोटींपर्यंत घसरण झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण सोळा कोटींची संपत्ती आहे. खासदार गोडसेंच्या नावे १३ कोटी ३८ लाखांची तर पत्नी अनिता गोडसेंच्या नावावर दोन कोटी ८२ लाखांची संपत्ती (worth Rs 16 crore) असल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. विशेष म्हणजे खासदार गोडसेंवर साडेपाच कोटींचे तर पत्नीच्या नावे एक कोटी पाच लाखांचे अर्ज असल्याचे दिसून येते. गेल्या पाच वर्षात खासदारांच्या संपत्तीत वाढ होण्याऐवजी अचल संपत्ती सव्वासहा कोटींवरुन सव्वापाच कोटींपर्यंत घसरण झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.(Mahayuti candidate from Nashik Hemant Godse worth Rs 16 crore )

खासदार हेमंत गोडसे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर २०१९ मध्ये साधारणत: साडेसहा कोटींची संपत्ती होती. अचल सपत्तीत रेणुका बिल्डकॉन, गुरू एटंरप्रायझेस, जय मातादी एंटरप्रायझेस, मातोश्री एंटरप्रायझेस, याप्रमाणे विविध संस्थामध्ये त्यांचे समभाग आहेत. गोडसे यांना स्वमालकीची व वडिलोपार्जित शेतजमिनी आहेत. देवळाली कॅम्पला ऑफीस आहे, संसारी व लॅम रोडला घर सदनिका आहेत. २०२४ पर्यंत या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येते. सद्यस्थितीला त्यांच्याकडे पाच लाख सात हजारांची रोख रक्कम आहे. तर त्यांची चल संपत्ती ८ कोटी ८ लाखांची असून, अचल संपत्ती पाच कोटी ३० लाखांवर आहे. पाच लाख ५६ हजार रुपयांचे कर्जही गोडसेंनी घेतले आहे. पत्नीच्या नावे दोन कोटी २९ लाखांची चल संपत्ती तर, ५३ लाख २१ हजारांची अचल संपत्ती आहे. त्यांच्याही डोक्यावर एक कोटी पाच लाखांचे कर्ज असल्याचे गोडसेंनी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे. तर विविध बँकांमध्ये ठेवी, बचत खात्यात रक्कम, सोने, शेअर्स यामध्येही चांगली गुंतवणूक असल्याचे दिसून येते. त्यांची सून भक्ती अजिंक्य गोडसे यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यामुळे त्यांच्या नावावरील संपत्तीही समोर आली आहे. भक्तीच्या नावे १९ लाख ७३ हजारांची चल संपत्ती तर तिचे पती अजिंक्य गोडसे यांच्या नावावर दोन कोटी ९ लाख रुपयांची चल संपत्ती असल्याचे दिसून येते. अचल अर्थात स्थावर मालमत्ता त्यांच्या नावावर नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी