राजकीय

२००० कोटींनी न्याय विकत घेतला ; देवेंद्र फडणवीसही व्यवहारात सामील

शिवसेना आणि धनुष्य बाण चिन्हासाठी २००० कोटी रुपयांचा सौदा झाल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हा निर्णय गुणवत्तेच्या निकषावर नाही, तर यासाठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असलयाचे जाहीर करताच शिंदे गटाकडून न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे. या आर्थिक व्यवहारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेदेखील नाव गोवण्यात आल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोपांना ऊत आला आहे. संजय राऊत आपल्या विधानावर ठाम असून वेळ आल्यावर पुरावे सादर करण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. न्याय आणि निर्णय यामध्ये फरक असून प्रचंड पैशांचा वापर करून हा निर्णय विकत घेण्यात आला आहे, असे राऊत म्हणाले. (2000 crore bought justice; Devendra Fadnavis also involved in the transaction)

संजय राऊत यांनी या व्यवहारात देवेंद्र फडणवीसही सामील असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, “मी याबाबत कालच स्पष्टपणे सांगितले होते. आज पुन्हा मी हेच सांगत आहे की चिन्ह आणि पक्षाचं नाव यासाठी २ हजार कोटींचा सौदा झाला आहे. निकाल लागण्याची प्रक्रिया सुरू होती त्यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस सांगत होते, की निकाल आपल्याच बाजूने लागेल. मिंधे गटाचे लोक, एक केंद्रीय मंत्रीदेखील हाच दावा करत होते. या निर्णयासाठी दोन हजार कोटींचा व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती त्यावेळीही माझ्याकडे होती. अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मिंधे गट आमच्या खिजगणतीतही नाही

आमचा प्रतिस्पर्धी केवळ भाजप असून मिंधे गट आमच्या खिजगणतीतही नाही, असे सांगत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाला झिडकारले आहे. ते म्हणाले, “कोण विरोधक? आम्ही फक्त भाजपचे विरोधक आहोत. देशाला हुकूमशाहीकडे नेणाऱ्या भाजपशी आमची लढाई आहे. मिंधे गट भाजपचा गुलाम आहे. आमच्याशी लढण्याची त्यांची पात्रताच नाही. पैसे मिंध्याचा आणि यंत्रणा भाजपची या पद्धतीने त्यांनी न्याय विकत घेतला आहे. तुम्ही शिवसेनेवर हल्ला कराल, त्यांना संपवण्याचा प्रयत्न कराल. पण शिवसेना संपणार नाही. ती अंगार आहे. ती विझणार नाही”, असा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

तिथे हजर असतो तर संजय राऊतांना मारले असते ; संदीप देशपांडे संतापले

शिवरायांच्या प्रतिमेची तोडफोड, हार कचरापेटीत फेकला ; JNU मध्ये राडा

‘शिवसेना, पक्षचिन्हा’बाबत ठाकरे गटाची पुढील भूमिका काय? सर्वोच्च न्यायालयात जाणार खटला; वाचा सविस्तर

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

2 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

3 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

3 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

3 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

9 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

10 hours ago