शिवजयंती साजरी करण्यावरून रविवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) ‘एनएसयुआय’ आणि अखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी ‘एसएफआय’च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची तोडफोड केली आणि प्रतिमेला घालण्यात आलेला हार कचरापेटीत फेकून दिला. यावरून दोन्ही विद्यार्थी संघटना आमने-सामने आल्याने विद्यापीठात तणावाची परिथिती निर्माण झाली होती. (Vandalism of Shivaji maharaj’s image, garland thrown in dustbin)

‘एसएफआय’च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचाच नव्हे तर, महात्मा ज्योतिबा फुले आणि महाराणा प्रताप यांचादेखील अवमान केला आहे. शिवजयंतीचा कार्यक्रम संपताच ‘एसएफआय’चे विद्यार्थी या ठिकाणी आले आणि त्यांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. भारतीयांसाठी आदर्श असलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचा ते अपमान का करतात?,” अशी संतप्त प्रतिक्रिया अभाविपच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना अभाविपचे सचिव उमेशचंद्र अजमेरा म्हणाले, “शिवजयंतीनिमित्त आम्ही स्टुडंट अॅक्टिविटी सेंटर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवली होती. मात्र, ‘एसएफआय’च्या विद्यार्थ्यांनी ही प्रतिमा बाहेर काढली. तसेच हार कचरापेटीत फेकून दिला.”
ABVP members kept Shivaji’s portrait at JNUSU office for which permission from JNUSU delegation was needed. Despite that, they did it illegally. Other students came there & removed all portraits for screening programme due to which fight broke out b/w two groups:JNU NSUI Gen Secy pic.twitter.com/TXdJYSlTMH
— ANI (@ANI) February 19, 2023
मात्र, ‘एनएसयुआय’ने अभाविपचे आरोप फेटाळून लावले आहेत. ” ‘अभाविप’ने ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. पण ‘अभाविप’ने अशी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. तशी रीतसर परवानगी घेण्याआधीच याठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे ‘एनएसयुआय’च्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणाहून हटवली”, अशी प्रतिक्रिया एनएनयुआय सचिवांनी दिली. दरम्यान, ‘एसएफआय’च्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ‘अभाविप’ने केली आहे.
हे सुद्धा वाचा
धनुष्य-बाण, शिवसेनेसाठी २००० कोटींचा सौदा ; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप
शिवभक्तांना शिवनेरीवर येण्यापासून मज्जाव का करता? संभाजी राजेंनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले
२०२३ च्या मध्यावर मोदींचा राजीनामा ; न्यायमूर्ती, राजकारणी, उदयगपतींवर ‘पेगासस’ची हेरगिरी