30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीय'शिवसेना, पक्षचिन्हा'बाबत ठाकरे गटाची पुढील भूमिका काय? सर्वोच्च न्यायालयात जाणार खटला; वाचा...

‘शिवसेना, पक्षचिन्हा’बाबत ठाकरे गटाची पुढील भूमिका काय? सर्वोच्च न्यायालयात जाणार खटला; वाचा सविस्तर

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण ही निशाणी शिंदे गटाला देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय दोषपूर्ण आहे. या निर्णयाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे याविरोधात दाद मागणार आहोत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. त्याला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. सोमवारीच याबाबत सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाकडून केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी याबाबतचे संकेत दिले आहेत. दूध का दूध, पानी का पानी झाल्याची भाषा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक आयोगाच्या निवाड्यावर केली. पण अजून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणे बाकी आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवाय, निवडणूक आयोगाचा निकाल न पटल्यास न्यायालयात दाद मागण्याची मुभा असल्याचे स्वतः सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयातील त्रुटींच्या आधारे सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून दाद मागितली जाणार असल्याचे वृत्त आहे.

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित खटल्यांचा दाखला देतानाच निवडणूक आयोगाच्या 78 पानी निकालांतील त्रुटींवर ठाकरे गटाकडून बोट ठेवले जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या घटनेतील बदल एकतर्फी आणि लोकशाही पद्धतीने झाले नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनाही याच घटनेनुसार नेतेपद देण्यात आले होते. त्याला निवडणूक आयोगाने योग्य ठरवले. मग उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी घटना चुकीची कशी ठरू शकते, असा सवाल ठाकरे गटाकडून केला जात आहे. शिवाय आमदार आणि खासदारांना मिळालेली मते ग्राह्य धरण्यात आली आहेत. मग जे उमेदवार पराभूत झालेत, त्यांची मतेही ग्राह्य का मानली गेली नाही, ती मतेही जनतेनेच दिली होती. याशिवाय अनेक तांत्रिक मुद्दे आणि कायदेशीर पेच आहेत, ज्यांना ठाकरे गटाने अर्जाचा आधार बनविणार असल्याचे समजते.

हे सुद्धा वाचा : निवडणूक आयोग मोदींचा गुलाम ; उद्धव ठाकरेंचा घणाघात

चोरीचे धनुष्य बाण घेऊन निवडणुकीला सामोरे या..! उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान

पंतप्रधानांनी आता जाहीर करावे, लोकशाही नाही बेबंदशाही सुरु आहे : उद्धव ठाकरे

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाकडून आव्हान दिले जाण्याची शक्यता गृहित धरून शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच कॅव्हेट दाखल केले आहे. आमचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये, अशी विनंती शिंदे गटाने न्यायालयाला केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून या कॅव्हेटला उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे. सोमवारी, 20 फेब्रुवारी रोजी तातडीची सुनावणी घेण्याची मागणी करण्यात येईल, अशी माहीती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी