31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयमुंबईच्या गरज लक्षात घेऊन बजेट बनवले आहे, आदित्य ठाकरे सूचक वक्तव्य

मुंबईच्या गरज लक्षात घेऊन बजेट बनवले आहे, आदित्य ठाकरे सूचक वक्तव्य

टीम लय भारी
मुंबई:-  मुंबईचं शाश्वत विकास करणारे बजेट आहे. मुंबईचे सर्व पैलू या अर्थसंकल्पामध्ये घेतले गेले आहेत. केंद्र सरकारच्या बजेटमधून नैराश्य दिसले. तसे हे बजेट नाही. विरोधक टीका करतात, कारण तसे व्हिजन त्यांच्याकडे नाही, असा हल्लाबोल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला.  हे बजेट प्रत्येक व्यक्तीचा आवाज ऐकून, मुंबईच्या गरज लक्षात घेऊन बजेट बनवले आहे.(Aditya Thackeray, budget has been   view needs Mumbai)

विरोधक केवळ टीका करत आहेत. विरोधक टीका करतात, कारण तसे व्हिजन त्यांच्याकडे नाही, असा हल्लाबोल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांनी केला.

हे सुद्धा वाचा

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरीत होणार

‘पेगॅसस’ च्या मुद्द्यावरुन शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई महानगरपालिकेचा 2022-23 वर्षाचा अर्थसंकल्प सादर

BJP and Shiv Sena are squabbling over whether wine is liquor. Who is correct?

“आत्ताचं महानगरपालिकेचं बजेट हे एका अत्यंत संवेदनशील, प्रगतीशील राज्याच्या राजधानीचं आहे. यात महिलांसाठी, पर्यावरणासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टींची तरतूद आहे. एकंदरच मुंबईच्या प्रगतीसाठी या बजेटमध्ये तरतुदी केलेल्या आहेत. पुढे चला मुंबई हाच नारा घेऊन आता आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्री मुंबईचे असल्याने मुंबईसाठी ज्या काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत, ते या अर्थसंकल्पातून दिसत आहे”.असे ते म्हणाले.

मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावरुन विरोधकांनी टीका केली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांच्या सत्ताकाळात काहीही झालेले नाही. विकास कुठे आहे, असा विरोधकांनी प्रश्न विचारला. त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई पालिकेत 25 हजार विद्यार्थी वाढले आहेत. प्रत्येकवर्षी विद्यार्थी संख्या घटली आहे असं चित्र पहातो. मात्र यावर्षी विद्यार्थी संख्या वाढली. मोफत शिक्षणासाठी बोर्ड आणत आहोत. त्याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे, प्रतिसाद चांगला मिळाला आहे. शिक्षणासाठी जसा फंड वापरला जाईल, तसा तो वाढवला जाईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले, प्रगतशील, संवेदनशील राज्याच्या राजधानीचे बजेट आहे. महिलांसाठी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ग्रीन फायनान्स आहे. पर्यावरणासाठी आहेत. ‘पुढे चला मुंबई’ हा नारा घेऊन पुढे जायचे आहे. मुंबईचे मुख्यमंत्री असल्याने मुंबईसाठी चांगल्या गोष्टी झाल्या आहेत. त्या बजेटमध्ये दिसत आहेत. मुंबईचं शाश्वत विकास करणारं बजेट आहे. मुंबईचे सर्व पैलू या बजेटमध्ये घेतले गेले आहेत. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामधून नैराश्य दिसले तसे हे बजेट नाही. हे बजेट प्रत्येक व्यक्तीचा आवाज ऐकून, मुंबईच्या गरज लक्षात घेऊन बजेट बनवले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी