राजकीय

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा; विधानभवनाच्या पायऱ्यांवर NCPचा राडा

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे संतप्त झालेले विरोधी पक्षाच्या आमदारांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिंदे-फडणवीस सरकरविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आले.

आज अधिवेशन सुरू असताना, विरोधी पक्षनेते @AjitPawarSpeaks आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत महाविकास आघाडीच्या आमदारांनी राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी ‘असंवेदनशील कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा’, ‘गद्दार सत्तार हाय हाय’, ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तार यांचा धिक्कार असो’, ‘किसानों के गद्दारोंको जुते मारो सालों को’, ‘शेतकऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘पन्नास खोके एकदम ओके’, ‘बोलाचीच कढी बोलाचिच भात जेवोनिया तृप्त कोण झाला’, ‘यंदाचा अर्थसंकल्प वाया गेला’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मागील आठवड्यात मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. अवकाळीने मका, गहू, हरभरा, कापसाचं मोठं नुकसान झाल्याने बळीराजावर आभाळ कोसळलंय. या नुकसानीची पाहणी आज कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांनी संवाद साधला. माझ्या मतदारसंघात फिरुन आलो. शेतीचं फार काही नुकसान झालेलं नाही, असं सांगताना जिथे नुकसान झालंय तिथे पंचनाम्याचे आदेश दिले आहेत, असं ते म्हणाले होते.

काय म्हणाले होते कृषीमंत्री?

“शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार आहे.” माझ्या मतदारसंघात फिरुन आलो, शेतीचं फार नुकसान झालं नाही. वस्तूनिष्ठ पंचनाम्यासाठी सोयगावला जावून आलो. मोठं नुकसान नाही परंतु जे नुकसान झालं त्याचं पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत, असंही सत्तार यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा : 

शेतकरी आत्महत्येवर कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी

संजय राऊत म्हणाले; औरंगजेबजी, कसाबजी, शाहिस्तेखानजी, अब्दुल गुरूजी…

संजय राऊतांना परिणाम भोगावे लागतील; अब्दुल सत्तारांचा इशारा

Team Lay Bhari

Recent Posts

मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…

5 hours ago

हिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग

हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…

6 hours ago

ई-कुबेर प्रणालीमुळे दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष

नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…

6 hours ago

पीके करपल्यावर पाण्याचे आवर्तन; शेतकऱ्यांचा संताप

एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…

7 hours ago

‘खरे शिवसेना प्रमुख असाल तर…’ रत्नागिरीतून अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…

7 hours ago

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

17 hours ago