25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeराजकीयसंजय राऊत म्हणाले; औरंगजेबजी, कसाबजी, शाहिस्तेखानजी, अब्दुल गुरूजी...

संजय राऊत म्हणाले; औरंगजेबजी, कसाबजी, शाहिस्तेखानजी, अब्दुल गुरूजी…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी मुघल बादशहा औरंगजेब (Aurangzeb) याचा उल्लेख औरंगजेब’जी’ असा आदरार्थी केला होता. त्याबाबतचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बावनकुळे यांची खिल्ली उडविली आहे. भाजपचे नेते औरंगजेबजी, कसाबजी, शाहिस्तेखानजी, अब्दुल गुरूजी… असेही उल्लेख करतील, अशा शब्दांत खासदार राऊत यांनी बावनकुळे यांचा समाचार घेतला आहे. बावनकुळे यांच्याकडे महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. त्याचाही राऊत यांनी समाचार घेतला आहे. खोक्या, पेट्या, पाकीटे, कुणाला कसे विकायचे ही भाजपची रणनिती असते…, असा टोला खासदार राऊत यांनी लगावला.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर झालेलया लैंगिक आरोपाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी त्यांची चांगलीच कोंडी केली होती. या प्रकरणी “दोपहर का सामना”मध्ये बातमी छापून आली होती. ते वार्तांकन चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आक्षेप शेवाळे यांनी घेतला होता. त्याविरोधात त्यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता “सोडा हो.. अशा खूप नोटिसा येतात..” असे म्हणत आपण असल्या नोटिसांना आपण भीक घालत नसल्याचे सूचित केले. राऊत यांनी शेवाळे यांनी दाखल केलेल्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. कुणाकडून असा दावा करण्यात आला, असे उपरोधिकपणे विचारात मला वाटलं मुंबईवर अणुबॉम्बचा पडला. सोडा हो, अशा खूप नोटिसा येतात अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

ब्रँडेड कंपनीची बनावट पायताणे; पोलिसांची दुकानदारांवर कारवाई

योगी आदित्यनाथ शिवरायांच्या मूर्तीपुढे झाले नतमस्तक!

रिषभ पंतच्या नावाने गिरगाव चौपाटीवर फलक

ताजमहालसमोर रोडशोची गरजच काय?
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रोडशोवर संजय राऊत यांनी बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. उत्तरप्रदेशमध्ये गुंतवणूक वाढावी यासाठी आदित्यनाथ मुंबईत रोडशो करणार आहेत. यावरून राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. गुंतवणुकीसाठी आदित्यनाथांना मुंबईतील ताज हॉटेलसमोर रोडशो करण्याची गरजच काय?, असे विचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत दाओसला परिषदेला जात आहेत, दाओसच्या रस्त्यावर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ते रोडशो करणार आहेत का? असा उपरोधिक सवाल त्यांनी केला. तुमच्या राज्याच्या विकासासाठी मुंबईकडे मदत मागायला आला आहात की राजकारण करायला आला आहात असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे. आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर आमचा काही आक्षेप नाही, पण ते इथे येऊन राजकारण करत असतील तर मात्र आमचा आक्षेप असेल, असे मातही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी