31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयसर्वोच्च न्यायालयाने नपुंसक म्हटले त्याची लाज वाटत नाही; अजित पवार यांची शिंदे-फडणवीस...

सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक म्हटले त्याची लाज वाटत नाही; अजित पवार यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

सोनिया गांधी, पवार साहेब, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. ते सरकार आर्थिक शिस्तीने यशस्वी चालवले. या सरकारची आठ लाख कोटींची बिले थटली, राज्यात अवकाळीमुळे शेतकरी अडचणीत आहे, त्यांना मदत करण्याची भूमिका या सरकारची नाही. शिंदे-फडणवीसांना त्यात रस नाही. त्यांना वेगळ्याच गोष्टीत रस आहे. कायदा सुव्यवस्था विघडली आहे, त्यावर हे सरकार बोलायला तयार नाही, अशी टीका विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुंबईतील वज्रमुठ सभेतून केली.

१ ते ५ तारखेपर्यंत पाऊस सांगितला आहे. १० महिने झाले सरकार निवडणूका घ्यायला घाबरत आहे, भीती कशाची वाटतेय, का निवडणूका घेत नाही. शिंदे-फडणवीस सरकारला जनता काय करेल याची भीती आहे. तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदावर बसले आहेत. इतर लोकांना महापौर, उपमहापौर व्हावे वाटत नसेल का, असा सवाल अजित पवार यांनी केला.

अजित पवार म्हणाले, महागाई वाढली आहे, हे जाहिरात करत आहेत. बेस्टच्या बसेसवर जाहिराती करत आहेत. लोकांच्या मनातील सरकार नाही, गद्दारी करुन आलेले हे सरकार आहे. महापुरुषांचा आदर्श असणारा हा महाराष्ट्रात चुकीचा कारभार सुरु आहे. ७५ हजार जागा भरणार म्हणत आहेत, पण कधी भरणार याचे उत्तर नाही.

सर्वौच्च न्यायालयाने या सरकारला नपुंसक म्हटले, त्याची देखील यांना लाज वाटत नाही, दंगली थांबवू शकत नाही हे सरकार म्हणून न्यायालयाने त्यांना नपुंसक सरकार म्हटले. मात्र त्यांना लाज वाटत नाही. मुख्यमंत्री अनेकदा बोलताना चुकतात. द्रौपदी मुर्मुंना पंतप्रधान म्हणाले. साडे तीनशे पन्नास कोटी मेट्रो लाईन टाकली म्हणाले, एमपीएससीबाबत देखील असेच चुकीचे विधान केले, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे दर ठरवले जात आहेत. राजू शेट्टी सारखे लोक बोलत आहेत. राज्यात घडले नव्हते असा भ्रष्टाचारी कारभार महाराष्ट्रात सुरू आहे. आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्राचा नंबर घसरलेला आहे. वारेमाप उधळपट्टी सुरु आहे. यशवंतरावांपासून जाहिरातबाजीचा हिशोब काढा, गेल्या १० महिन्यात जाहिरातींवर जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरु आहे. फडणवीस-शिंदेनी १५० पेक्षा जास्त बैठका घेतल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले. अशा पद्धतीने सरकारे पाडायला लागला तर लोकशाही कशी राहणार. सत्ता येते जाते पण जणतेच्या विश्वासाला कुठे तडा गेला नाही पाहिजे.

हे सुद्धा वाचा

न्यायमूर्ती शाह निवृत्त होण्यापूर्वी महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा निकाल आला नाही तर काय?

गेली नऊ वर्षे फक्त मन की बात, काम की बात काहीच नाही; संजय राऊतांची मोदींवर सडकून टीका

अरे पचास खोका तुमने खाया, महाराष्ट्रने क्या पाया; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल  

या सरकारची आठ लाख कोटींची बिले थटली, राज्यात अवकाळीमुळे शेतकरी अडचणीत आहे, त्यांना मदत करण्याची भूमिका या सरकारची नाही. शिंदे-फडणवीसांना त्यात रस नाही. त्यांना वेगळ्याच गोष्टीत रस आहे. कायदा सुव्यवस्था विघडली आहे, त्यावर हे सरकार बोलायला तयार नाही, अशी टीका विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुंबईतील वज्रमुठ सभेतून केली.

पर्यटन विभागाने जाहिरात दिली, देखो अपणा महाराष्ट्र, मराठीत जाहिरात द्यायची ना, हा देखो कोणत्या राज्यातून आला. असा सवाल त्यांनी केला. जाती, धर्मात अंतर पाडून राजकीय डाव साधण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी