33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयअरे पचास खोका तुमने खाया, महाराष्ट्रने क्या पाया; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

अरे पचास खोका तुमने खाया, महाराष्ट्रने क्या पाया; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

अरे पचास खोका तुमने, खाया महाराष्ट्रने क्या पाया… पचास खोका बोलते ही तुम क्यो चिडते हो… असे रॅप सॉँग जितेंद्र आव्हाड यांनी म्हणत महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमुठ सभेतून विरोधकांवर हल्लाबोल चढवला. आज मुंबईत महाविकास आघाडीची सभा होत आहे. आव्हाड सभेत बोलत होते.

मुंबई खरी वाढवली, कामगारांनी, त्यांच्या घामाने मुंबई सजवली. १०५ मराठी माणसांनी बळी दिले तेव्हा कुठे मुंबई आपल्याला मिळाली. मुंबई देशाची राजधानी, पण गेल्या दहा वर्षात मुंबईचे महत्त्व कमी केले. मुंबईवर राग असलेली माणसे दिल्लीत बसली आहेत. दिल्लीच्या तख्ताला आव्हान कुठुन मिळाले असेल तर ते महाराष्ट्रातून हे त्यांनी विसरु नये, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बाजार समित्या मविआला मिळाल्या यातून स्पष्ट होते, लोकांचा कल गद्दारांच्या बाजूला नाही. खारघरमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारींचा कार्यक्रम भर १२ वाजता घेतला. मला मृत्यू झालेल्यांची आकडेवारी माहित नाही पण मृतांच्या चेहऱ्यावरील जखमा सांगतात, तिथे चेंगराचेंगरी झाली होती. मात्र एवढे होऊन देखील एकही मंत्री त्यांच्या कुटुंबियाला भेटला नाही.

बारसुमध्ये काय सुरु आहे? आमचा विकासाला विरोध नाही, पण तो तुम्ही त्यांच्या डोक्यावर मारणार असाल तर तो तुमच्या डोक्यावर मारल्याशिवाय राहणार नाही. बारसू सोनगावचे ग्रामस्थ बैठक घेण्याची मागणी करत आहेत. पण साधा कलेक्टर सुद्धा त्यांना भेटला नाही. स्थानिकांचे म्हणणेच तुम्ही एकुन घेणार नसाल तर तुमच्या मनात काळंबेर आहे हे स्पष्ट आहे. ज्यांना अटक केली त्यात महिलांचे प्रमाण अधिक होते. जगात अनेक रिफायनरी आहेत, ज्याच्या बाजूला समुद्र आणि नदी सुद्धा नाही, असे आव्हाड म्हणाले.

मी गृहनिर्मान मंत्री होतो. आदित्य, अस्लम यांनी निर्णय घेतला. आम्ही अडीच वर्षात झोपडीधारकांना झोपडी विकण्याच्या हक्काचा निर्णय घेतला. या सरकारने तो सात वर्षे केला. बीडीडीचा प्रश्न केला. ते काम आम्ही सुरु केल्याचे क्रेडीट घेऊ शकतो. तेथे ४३ बिल्डिंगचे काम सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे सरकार जाणार की राहणार? सुप्रीम कोर्टाचा फैसला कधी ? निकालाबाबत पाच न्यायाधीशात सहमती नसेल तर?

महिलेने शेजाऱ्याच्या मुलाविरोधात पोक्सोची तक्रार दिली; भांडणात शेजाऱ्याने महिलेला गोळ्या घालून ठार मारले

मनुकुमार श्रीवास्तव कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकता, स्थितप्रज्ञता, सहनशीलता,अन् संयमाची शांत मूर्ती..!

महाराष्ट्रात अनेक विद्रोह झाले. पहिला विद्रोह बुद्धांनी केला, बसवेश्वरांनी केला. चोखामेळ्याने केला. तुकाराम महाराजांनी केला. शिवाजी महाराज, शाहू,फुले, आंबेडकरांनी केला. अरे पचास खोका तुमने, खाया महाराष्ट्रने क्या पाया… पचास खोका बोलते ही तुम क्यो चिडते हो… असे रॅप सॉँग आव्हाड यांनी म्हटले. बाजार समित्यांचा जो निकाल लागला आहे. त्यातून दिसून येते महाविकास आघाडी एकत्र राहिली तर कोणाचा बाप महाराष्ट्राचे चित्र बदलू शकत नाही, असे आव्हाड म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी