31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयअजित पवार म्हणाले, विरोधक आहे म्हणून काय गचोरीला धरु का ?

अजित पवार म्हणाले, विरोधक आहे म्हणून काय गचोरीला धरु का ?

राज्यात बाजार समित्यांच्या निवडणूकांचे वातावरण तापले असून राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीनिवडणूकीच्या निमित्ताने बारामती येथे मेळाव्याला हजर होते. यावेळी बोलताना आपल्या नेहमीच्या शैलीत त्यांनी तुफान फटकेबाजी केली. अजित पवार म्हणाले, काही विरोधकांबाबत माझी सौम्य भूमिका असल्याचा आरोप माझ्यावर केला जातो, मात्र त्यामध्ये तथ्य नसून काही सभ्यता पाळाव्या लागतात. विरोधक आहे म्हणून काय गचोरीला धरु का? असा सवाल त्यांनी केला.

अजित पवार म्हणाले, चुकीच्या धोरणांच्या बाबतीत मी विरोधकांना नेहमीच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र अंगावर धावून जाणे, कागद फेकणे, हा असला विरोध मला मान्य नाही.

भाजपसोबत हातमीळवणीच्या चर्चांवर बोलताना अजित पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून माझ्याबाबत वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र मी एक घाव दोन तुकडे करणारा माणूस आहे. कोणीही अफवांना बळी पडू नका. पत्रकार माझ्या मागे हात धुवून लागले आहेत, पण मी राष्ट्रवादीसोबतच राहणार आहे. पक्ष जो निर्णय घेईल त्याच्याशी मी सहमत असेल, असे देखील पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा
महाविकास आघाडी झाली नाही तर २०२४ साठी काँग्रेसचा प्लॅन तयार : नाना पटोले

एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेऊन भाजप बनविणार पर्यायी सरकार, राज्याला मिळणार नवे नेतृत्व !

कर्नाटक निवडणूक प्रचार : देवेंद्र फडणवीस यांचा कानडी बाणा

बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रात एक नंबरची बाजार समिती करणार आहोत. येथे चांगल्या सोयी-सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. बारामती बाजार समितीचा चांगला नावलौकिक आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजारसमितीचा पारदर्शी कारभार सुरु असल्याचे देखील अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी