29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयबारसू प्रकल्पाबाबत चर्चेतून मार्ग काढा; शरद पवारांचा उदय सामंतांना सल्ला

बारसू प्रकल्पाबाबत चर्चेतून मार्ग काढा; शरद पवारांचा उदय सामंतांना सल्ला

बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोधासाठी स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून, प्रकल्पावरुन राजकीय वातावरण देखील आता तापले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने रिफायनरी प्रकल्प राबविण्यासाठी कंबर कसली असून महाविकास आघाडीने जोरदार विरोध केला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.

बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा कडाडून विरोध होत असून ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले आहे. दरम्यान शरद पवार आणि मंत्री सामंत यांच्या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बारसूमधील संघर्ष थांबविण्यासाठी मी मंत्री सामंत यांना ग्रामस्थ आणि सरकारच्या प्रतिनिधींची बैठक बोलविण्याची सुचना केली होती. त्यावर सामंत यांनी उद्याच बैठक घेणार त्या ठिकाणी बैठक घेण्याचे मान्य केल्याचेही पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अजित पवार म्हणाले, विरोधक आहे म्हणून काय गचोरीला धरु का ?

महाविकास आघाडी झाली नाही तर २०२४ साठी काँग्रेसचा प्लॅन तयार : नाना पटोले

एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेऊन भाजप बनविणार पर्यायी सरकार, राज्याला मिळणार नवे नेतृत्व !

पवार म्हणाले, स्थानिकांच्या भावना तीव्र असल्यास त्यांची नोंद घेणे गरजेचे आहे. मंत्री सामंत यांच्याकडून मी रिफायनरी प्रकल्पाचा आढावा घेतला. प्रकल्प उभा राहत असताना स्थानिक नागरिकांनी विश्वासात घेणे गरजेचे आहे. आता उद्याच्या बैठकीमध्ये कोणता तोडगा निघतो का हे पाहू असे देखील पवार यावेळी म्हणाले. तसेच चर्चेतून मार्ग काढण्याचा सल्ला दिला असल्याचे देखील पवार यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी