33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयनॉट रिचेबल ते 40 आमदारांच्या पाठिंब्याच्या स्वाक्षऱ्या; अजित पवार बंड पुकारणार?

नॉट रिचेबल ते 40 आमदारांच्या पाठिंब्याच्या स्वाक्षऱ्या; अजित पवार बंड पुकारणार?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भूमिकेवरून राज्यात तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. 35 ते 40 आमदारांसह अजित पवार हे भाजपसोबत जाणार, पवारांनी अमित शहांची भेट घेतली, जागावाटपही ठरल्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांचा बाजार गरम झाला आहे. या चर्चांवर अजित पवारांनी स्वतः खुलासा करण्याची मागणी ठाकरे गट आणि कॉंग्रेसकडून करण्यात आली. तर शरद पवारांच्या मूक संमतीनेच ही फूट पडणार असल्याचा दावा शिंदे गटाने केला. त्यातच येत्या 15 दिवसांत दोन राजकीय स्फोट होणार असल्याचा दावा करत प्रकाश आंबेडकरांनी चर्चेत आगीचा भडका उडविला आहे. त्याचप्रमाणे आज (18एप्रिल) अजित पवार राष्ट्रवादीच्या दोन आमदारांसह विधानभवनात दाखल झाले आहेत. त्यामुळे पुढची खेळी काय असणार हे पाहण्यासारखे आहे.

महाराष्ट्रात राजकीय नाट्याचा दुसरा अंक मिळणार का? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत कारण अजित पवार भाजपाला साथ देणार असल्याच्या जोरदार चर्चा राज्यात होत आहेत. दरम्यान नॉट रिचेबल ते 40 आमदारांच्या पाठिंब्याच्या स्वाक्षऱ्या इथपर्यंत आता अजितदादांचे बंड येऊन ठेपले आहे. अजितदादांच्या बंडाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 आमदारांपैकी 40 आमदारांनी पाठिंबा देऊन तशा स्वाक्षरी देखील केल्या आहेत, अशी बातमी आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. तर अजित पवारांना भाजपबरोबर जात मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. विशेषतः अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 35 ते 40 आमदारांचा पाठिंबाही आहे. राष्ट्रवादीच्या या 40 आमदारांनी अजित पवार यांना संमतीच्या सह्या दिल्या आहेत. योग्य वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल, असे वृत्त राष्ट्रवादी पक्षातील सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. मात्र शरद पवार भाजपबरोबर जाण्यास इच्छुक नसल्याचे वृत्त द न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानिमित्त माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्याच्या राजकारणाबाबत मोठा दावा केला आहे. आंबेडकर म्हणाले की, येत्या दोन आठवड्यात म्हणजे 15 दिवसांत महाराष्ट्रात मोठी उलथापालथ होणार आहे. राजकारणात दोन ठिकाणी मोठे राजकीय स्फोट होणार आहेत. त्यामुळे आपण 15 दिवस वाट बघुया. राज्यातील सरकार पडणार का? असं विचारलं असता,  त्यांनी 15 दिवसांत सर्वांना सर्वकाही समजेल, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत एक सूचक वक्तव्य केले आहे. मंत्री सत्तार म्हणाले की, “राज्यात सध्या सुरू असलेल्या परिस्थितीची कारणे आणि खरी माहीती या विषयाचे नेते शरद पवार यांनाच माहित आहे. अजित पवार आता राष्ट्रवादीत थांबणार नाहीत. ते सरकारसोबत येत असतील तर ही चांगली गोष्ट आहे. पण पुढील पाच वर्ष मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच राहतील. मुख्यमंत्री शिंदे यांची जी भूमिका असेल ती आम्हाला मान्य आहे. सर्व पक्ष त्यांच्या मागे आहे. ते 40 आमदारांचा विचार करून निर्णय घेतील, असेही सत्तार यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा:

मुंडे गेले कुणीकडे? धनंजय मुंडे नॉट रिचेबल; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राज्यात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा; अजितदादांबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठ विधान

अजित पवारांच्या अस्वस्थ भूमिकेवर राजकीय नेत्यांचा कानाडोळा !

Ajit Pawar, NCP, 40 MLAs support Ajit Pawar, sharad pawar, Ajit Pawar got the signatures of 40 NCP MLA; Ajit pawar will call a rebellion?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी