33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयराज्यात पुन्हा एकदा 'ऑपरेशन लोटस'ची चर्चा; अजितदादांबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान

राज्यात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा; अजितदादांबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु आहे, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांचे नेमके काय सुरू आहे असा प्रश्न एकाचवेळी सर्व राजकीय पक्षांना पडला आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदार फुटणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्याचप्रमाणे अजित पवार भाजपासोबत जाणार, या चर्चेने सोमवारी पुन्हा जोर धरला. त्यामुळे सर्व पक्ष आणि मीडिया त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सासवड (जि. पुणे) येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला ते जाणार होते. मात्र, हा कार्यक्रम रद्द करून ते मुंबईतच थांबले. मुख्यतः दुपारनंतर अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांची बैठक बोलावल्याच्या चर्चेने जोर धरला. दिवसभर याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाही त्यांनी मौन बाळगल्याने या चर्चेला बळच मिळाले. याचदरम्यान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सध्या राज्यात सुरु असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु आहे, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे होण्याचे गुण आहेत. त्यामुळे अनेकांना वाटतं की, अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपद लवकर मिळावं. पण भाजपासोबत जाऊन त्यांना कोणी पद देईल किंवा आश्वासन देईल, असं मला वाटत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांनी हा खुलासा केला असला तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे. 2019 रोजी अजित पवारांनी पहाटे राजभवनभर जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तेव्हाही असे काही घडेल असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना वाटले नव्हते. तसेच यापूर्वी त्यांनी अचानक अनेक राजकीय धक्के दिलेले आहेत. त्यामुळे यावेळीही त्यांच्या भाजपबरोबर जाण्याच्या सुरू असलेल्या चर्चेत तथ्य असावे, असा संशय राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. यासंदर्भात पक्षातील एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, अजित पवार पुढे येऊन जोपर्यंत खुलासा करत नाहीत, तोपर्यंत हा संभ्रम कायम राहणार आहे.

खारघर येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्रभूषण’ सोहळ्याच्यावेळी पुरस्कार उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्या तसेच उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबीयांची भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे, असा खुलासा अजित पवार यांनी ट्विट करत केला आहे. तसेच मंगळवारी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा:

महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातासोबत चेंगराचेंगरीही; हा आयोजकांचा हलगर्जीपणा; अजितदादांनी सांगितली नेमकी चूक

अजित पवारांच्या अस्वस्थ भूमिकेवर राजकीय नेत्यांचा कानाडोळा !

अजित पवारांवर होणार ईडीची कारवाई?

महाराष्ट्र ऑपरेशन लोटस 2022 

2022 मध्ये महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात बंड पुकारणारे शिवसेना आमदार (शिवसेना आमदार) गुजरातमार्गे आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले. आसाममधील पंचतारांकित हॉटेलमध्ये दहा दिवसांपेक्षा जास्त काळ राहून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस (ऑपरेशन लोटस 2022) केले गेले. याच पद्धतीचे ऑपरेशन राज्यात पुन्हा एकदा होण्याच्या चर्चा सुरू आहेत.

Operation Lotus in the maharashtra, Prithviraj Chauhan, Ajit pawar, Operation Lotus in the maharashtra; Prithviraj Chauhan’s big statement about Ajit pawar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी