35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयअजित पवारांच्या अस्वस्थ भूमिकेवर राजकीय नेत्यांचा कानाडोळा !

अजित पवारांच्या अस्वस्थ भूमिकेवर राजकीय नेत्यांचा कानाडोळा !

विरोधी पक्षनेते अजित पवारांचे नेमके काय सुरू आहे असा प्रश्न एकाचवेळी राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेनेलाही पडला आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदार फुटणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. यामुळे ते भाजपच्या जवळ-जवळ पोहोचले आहेत, असे सतत म्हटले जाते. त्यामुळे सर्व पक्ष आणि मीडिया त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत. मात्र अजित पवारांच्या या भूमिकेबाबत सर्वच राजकीय नेत्यांनी जाणूनबुजून कानाडोळा केला आहे.

विशेषतः एप्रिलच्या उत्तरार्धात किंवा मे महिन्याच्या पूर्वार्धात सत्तासंघर्षाचा निकाल लागेल. या निकालानंतर महाराष्ट्राची सत्तेची घडी आहे तशी राहणार नाही. बदलत्या परिस्थितीत अजित पवार एका पहाटे उथळलेला डाव पुन्हा मांडू शकतात, असे अंदाज बांधले जात आहेत. अजित पवार भाजपमध्ये जाणार असे ठाम विधान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. मात्र सर्वांच्याच प्रतिक्रिया कानावर हात ठेवणाऱ्या होत्या.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्याबाबत विधान केले आहे. भुसे म्हणाले की, अजित पवार यांच्याबाबत मला माहिती नाही. वरिष्ठ पातळीवर या गोष्टी सुरू आहेत. अजित दादा अस्वस्थ आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दादा अस्वस्थ असल्याचं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं. दरम्यान ठाकरे गटावर टीका करताना दादा भुसेंनी म्हटलं की, मविआच्या संगतीचा हा परिणाम आहे. विकासकामे होत आहेत त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. विकासावर बोलायला तयार नाहीत. शिवसेना हा पक्ष असा आहे जो तळागाळात जाऊन काम करतोय.

अजित पवारांचे गॉडफादर काका व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, मला माहीत नाही, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मला माहीत नाही. भाजपचे ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, गनिमी कावा असेल पण मला माहीत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक मंत्री उदय सामंत यांनाही अजित पवारांच्या हालचालींवर संशय आहे. पण, काय सुरू आहे हे त्यांनाही माहीत नाही. अजित पवारांचे काहीतरी सुरू आहे, या निष्कर्षावर मात्र सर्वांचे एकमत दिसते.

एमएससी बँक घोटाळा प्रकरण:
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत आर्थिक घोटाळा झाला आहे. यातला एक भाग हा जारेंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा घोटाळा आहे. या कारखान्याबाबत झालेला व्यवहार बेकायदेशीर आहे आणि या बेकायदेशीर व्यवहारात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचा संबंध असल्याचं या प्रकरणात नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवारांवरांच्या अडचणीत वाढ होण्याची अशक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : 

अजित पवारांचा यू-टर्न कोणासाठी?

अजित पवारांवर होणार ईडीची कारवाई?

मला कुठलीही क्लीनचीट मिळालेली नाही : अजित पवार

Ajit Pawar is suspect but MVA leaders are confused, Ajit Pawar, NCP, MVA, Ajit Pawar is suspect but MVA leaders are confused

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी