31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्र्यांच्या पीएसाठी अमित शाह घेणार पहिली प्रचार सभा

मुख्यमंत्र्यांच्या पीएसाठी अमित शाह घेणार पहिली प्रचार सभा

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाह मंगळवारी, दसऱ्याच्या दिवशी पहिली सभा घेत आहेत. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या औसा (लातूर) मतदारसंघात शाह पहिली सभा घेणार आहेत.
त्यानंतर दुसरी सभा पंकजाताई मुंडे यांच्यासाठी भगवान गडावर घेतली जाणार आहे. अमित शाह या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण 18 सभा घेणार आहेत. यातील पहिल्या दोन सभा मंगळवारी होणार आहेत. यावेळी अमित शाह यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती असेल.
मुख्यमंत्र्यांनी त्यांचे वजन वापरून अभिमन्यू पवार यांना औसा विधानसभेचे तिकिट दिले आहे. परंतु स्थानिक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पवार यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आहे. गेल्या आठवड्यात तिकिट जाहीर झाल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी तीन तास रास्ता रोको केला होता. या पार्श्वभूमीवर पवार यांना औसाची लढत सोपी राहणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
औसा मतदारसंघात सध्या काँग्रेसचे बसवराज पाटील हे आमदार आहेत. पाटील हे यावेळी सुद्धा मैदानात उतरले आहेत. भाजपच्या अंतर्गत दुहीचा फायदा बसवराज यांना होईल की मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त पवार यांना पावेल याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी