35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयशरद पवारांचा उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातील दौरा

शरद पवारांचा उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातील दौरा

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला पहिल्या टप्प्यातील प्रचार दौरा गाजविल्यानंतर आता ते दुसऱ्या टप्प्याला सुरूवात करीत आहेत.

दुसऱ्या टप्प्यात अहमदनगर, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात ते प्रचार सभा घेतील. 8 ते 10 ऑक्टोबर असा तीन दिवस हा दौरा असेल.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता पवार यांची पहिली जाहीर सभा होईल. त्यानंतर पारोळ्यामध्ये (सायंकाळी 5) दुसरी सभा होईल. विदर्भात अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे सकाळी 11.30 वाजता, तर त्याच दिवशी संध्याकाळी वाशिम जिल्ह्यातील मानोरा – कारंजा येथे दुपारी 4 वाजता त्यांच्या सभा होतील. 10 ऑक्टोबर रोजी हिंगणघाट येथे सकाळी 10.30 वाजता, बुटीबोरी- हिंगणा 3 वाजता, काटोल 5 वाजता या ठिकाणी जाहीर सभा होतील.

पहिल्या टप्प्यात पवार यांनी उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर येथे सभा घेतल्या होत्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी