30 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयअमोल मिटकरींचा व्यंकय्या नायडूंवर निशाणा, ‘तुमच्या जागेचा सातबाराही शिवछत्रपतींमुळे असल्याचा’ हाणला टोला

अमोल मिटकरींचा व्यंकय्या नायडूंवर निशाणा, ‘तुमच्या जागेचा सातबाराही शिवछत्रपतींमुळे असल्याचा’ हाणला टोला

टीम लय भारी

मुंबई : ‘जय शिवाजी, जय भवानी’ असा उल्लेख केल्याने राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना हटकले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी ( Amol Mitkari attacks to Venkaiah Naidu ) यांनी नायडू यांच्यावर निशाणा साधला आहे.

Mahavikas Aghadi

‘नायडू साहेबांनी इतिहास वाचायला हवा होता. ज्या जागेवर बसून शिवरायांच्या जयजयकाला विरोध केला, ती खूर्ची, जागा व तिचा सातबारा हे सर्व काही छत्रपतींची पुण्याई आहे’, अशा शब्दांत मिटकरी यांनी नायडू यांच्यावर आसूड ओढला आहे ( Amol Mitkari reminds history to Venkaiah Naidu ).

हे सुद्धा वाचा

भाजपला शिवरायांच्या नावाची ॲलर्जी,  राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार

‘तुम्ही चुकलात. तुमच्या वागण्याचा निषेध’ अशी पुस्तीही मिटकरी यांनी जोडली आहे. बहुजन विचारसरणीचे शिवव्याख्याते म्हणून अमोल मिटकरींची महाराष्ट्राला ओळख आहे. त्या पार्श्वभूमीवर मिटकरी यांनी व्यक्त केलेल्या भावनांना वेगळे महत्व आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी