29 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024
HomeराजकीयAtmanirbhar Bharat : मोदी सरकारच्या पॅकेजवर राजकारण तापले!

Atmanirbhar Bharat : मोदी सरकारच्या पॅकेजवर राजकारण तापले!

टीम लय भारी

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत (atmanirbhar bharat abhiyan) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध योजनांची घोषणा दोन टप्प्यात केली. यानंतर आता विरोधीपक्ष काँग्रेससह सोशल मिडियावरही चौफेर टीका केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. यानंतर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दोन टप्प्यांत यांची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात मध्यम लघु आणि कुटीर उद्योगांसाठी मदतीची घोषणा करण्यात आली. दुस-या टप्प्यात स्थलांतरित मजूर आणि शेतक-यांसाठी सरकारने मदतीचे पेटारे खुले केले. मात्र, यावरून आता राजकारणही तापू लागले आहे.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आर्थिक पॅकेजवरून सरकारवर निशाणा साधला आहे. ‘श्रीमती निर्मला सीतारमन यांनी आर्थिक पॅकेजसंदर्भात दुस-या दिवशी केलेल्या घोषणांचा अर्थ – ‘खोदा पहाड, निकला जुमला’, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक व्हीडिओ ट्विट करत केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. राहुल यांनी स्थलांतरित मजुरांचा एक मार्मिक व्हीडिओ ट्विट करत लिहिले आहे की, ‘अंधकार गडद आहे, कठीण परिस्थिती आहे, हिंमत ठेवा, आम्ही या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी उभे आहोत. सरकारपर्यंत यांच्या किंकाळ्या पोहोचवू. जनतेच्या हक्काची प्रत्येक मदत मिळवून देवू. देशातील सामान्य जनता नाही. हे तर देशाच्या स्वाभिमानाचा ध्वज आहे… तो कधीही झुकू देणार नाही.’

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट करून सरकारवर टीका केली आहे. “निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेचं सार, जगायचं असेल, तर आणखी कर्ज घ्या. आत्मनिर्भरतेचा अर्थ समजला का?,” अशी टीका सावंत यांनी केली आहे.

सोशल मिडियावरही चौफेर टीका केली जात आहे.

Atmanirbhar Bharat : मोदी सरकारच्या पॅकेजवर राजकारण तापले!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी