राजकीय

मंत्रिमंडळ विस्तार होत नसेल तर स्पष्ट सांगा: आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

राज्यात शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis Govt) यांचे सरकार स्थापन होवून सहा महीने झाले तरी, मंत्रिमंडळ विस्ताराचे (Cabinet expansion) घोडे अद्यापही अडून पडले आहे. शिंदे गटासोबत गेलेले प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी देखील तिखट प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार होत नसेल तर तसे स्पष्टच सांगायला हवे. बऱ्याच आमदारांमध्ये कुजबूज वाढली आहे. त्यामुळे आता जर मंत्रिमंडळ विस्तार होत असेल तर तो तातडीने करुन घ्यायला हवा, जे काही असेल ते एका घावात दोन तुकडे करायला पाहिजेत असे सर्वांचेच मत आहे. (Bachchu Kadu Said If the cabinet is not expanded, make it clear)

बच्चू कडू म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराचे प्रश्न शिंदे-फडणवीस यांनाच विचारायला हवेत माझ्या हातात काहीच नाही, माझ्याकडे केवळ दोन आमदार आहेत. त्यामुळे दोन आमदार असणाऱ्या माणसाला मंत्रिमंडळ ठरविण्याचा अधिकार नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचे एकदाच एक घाव दोन तुकडे करायला हवेत. मंत्रिमंडळविस्ताराबाबत फडणवीस म्हणाले होते, अधिवेशनाआधी विस्तार करु, आता अधिवेशन झाले. आता त्यात काही तांत्रिक अडचणी असू शकतील त्याबद्दल नाराज नाही. पण एकदाच काय ते सांगून टाकायला हवं, त्याबाबत जनतेतील संभ्रम दूर करायला हवा.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांना दिल्लीचा धत्तुरा; विधानसभेतील एकनाथ शिंदे यांच्या “मन की बात”ला अनुराग ठाकूर यांनी लाथाडले!

मुसळधार पावसात बाबा स्वत: कंदील घेऊन संयोगिताराजेंना शोधत आले; शाहू छत्रपती महाराजांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त संभाजीराजेंचे भावनिक पत्र

दांडीबहाद्दर ग्रामसेवकांना एकनाथ शिंदेंचा झटका! ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची हजेरी होणार बायोमेट्रिक प्रणालीद्वारे

महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदे बंड करुन सुरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत मविआमध्ये मंत्री असलेले बच्चु कडू देखली सहभागी होते. बच्चु कडू यांनी शिंदे गटासोबत जात नव्या सरकारला पाठींबा दिला. त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापनेवेळी काही आमदारांनाच मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार नाराज होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू हे नाराज असल्याची चर्चा देखील होती. शिंदे गटातील आमदारांबरोबर मध्यंतरी त्यांचा झालेला वाद अखेर शिंदे-फडणवीस यांना मध्यस्थी करुन सोडवावा लागला होता. त्यानंतर आमदार बच्चु कडू यांच्या मतदारसंघात भरघोस निधी देत त्यांची समजूत काढली होती. तसेच त्यांच्या पाठपूराव्यामुळे राज्यात दिव्यांग कल्याण हा स्वतंत्र विभाग देखील स्थापन करण्यात आला. हिवाळी अधिवेशना दरम्यान त्यांनी आवास योजनेसंदर्भात आंदोलन केले त्यावेळी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट देत त्याची दखल घेतली घेतली होती.

टीम लय भारी

Recent Posts

तापमानाचा पारा पुन्हा वाढणार : उष्णतेच्या लाटेचा इशारा

हवामान खात्याने देशातील सात राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा ( Heat wave warning) आहे त्यामुळे पुन्हा…

7 mins ago

संकटग्रस्त अजित पवारांना हवाय मनोज जरांगे पाटलांचा आधार

अजितदादांचे धाकटे सुपूत्र जय पवार थेट मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले. जय यांनी हेलिकॉप्टर…

25 mins ago

उन्हाचा तडाखा वाढला मात्र शहरात स्वाईन फ्लू नियंत्रणात

एप्रिल महिन्यामध्ये उन्हाचा तडाखा (Heat wave intensifies) मोठा होता त्यात शेवटच्या आठवड्यात पारा ४३ अंशावर…

27 mins ago

हेमंत करकरेंना लागलेली गोळी दहशतवाद्याच्या,उज्ज्वल निकमांनी…”; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचार  सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत.…

46 mins ago

विजय करंजकर आहेत ‘एवढ्या’ कोटींचे मालक

सध्या देशासह राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे  वारे वाहत असून सगळीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी…

1 hour ago

दिंडोरी लोकसभेतून माकपचे जे पी गावित घेणार माघार

दिंडोरी लोकसभा मतदार संघात सीपीएमचे उमेदवार जे. पी. गावित (J P Gavit) यांनी अपक्ष म्हणून…

2 hours ago