34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयनरेंद्र मोदींचे जाचक कायदे महाराष्ट्रात होऊ देणार नाही : बाळासाहेब थोरात

नरेंद्र मोदींचे जाचक कायदे महाराष्ट्रात होऊ देणार नाही : बाळासाहेब थोरात

टीम लय भारी

नाशिक : केंद्र सरकारने तीन नवीन कृषी कायदे आणले आहेत परंतु शेतकऱ्यांनी त्या कायद्याला विरोध दर्शविला आहे. केंद्र सरकारने कोणतीही चर्चा न करता कृषी कायदे मंजूर केले आहेत. केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि राज्य सरकार शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध करत आहे (Balasaheb Thorat said that Narendra Modi oppressive laws will not be allowed in Maharashtra).

कामगार कायद्यांमध्येही बदल करून भांडवलदारधार्जीणे कायदे केले जात आहेत. देशात प्रत्येक गोष्ट भांडवलदारांसाठी केली जात असल्याचा आरोप करीत राज्यभरातून शेतकरी कायद्यांच्या विरोधात ठराव आल्यास महाराष्ट्रात ते कायदे रद्द करण्यात येतील, असे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

कृषी कायदे रद्द करण्याची मागणी; आंदोलक शेतकऱ्यांनी PM मोदींना लिहिली रक्ताने पत्रे

बाळासाहेब थोरात यांच्या हातून माता भगिनींना मदतीचा हात

शेतकरी संघटनांच्या समन्वय समितीतर्फे केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणि प्रीपेड वीजबिल विधेयकाला विरोध आणि दिल्लीसह देशभरात लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनात सिन्नर फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकरी जनजागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून शरद पवार लवकरच घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

https://english.lokmat.com/maharashtra/balasaheb-thorat-reacts-to-narayan-ranes-arrest/

बाळासाहेब थोरात म्हणाले, पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या कायद्यामुळे होणारे नुकसान समजले आहे. यामुळे मागील आठ महिन्यांपासून ते याविरोधात आंदोलन करत आहेत. आपल्या शेतकऱ्यांना अजून ते समजलेले नाही आणि चिमटा बसल्याशिवाय ते समजणारही नाही, असे ते म्हणाले. परिषदेत करण्यात आलेल्या विविध ठरावांचे वाचन राजू देसले यांनी केले. उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावून पाठिंबा दिला (The farmers present raised their hands in support).

परिषदेच्या निमित्ताने ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्यास परवानगी नाकारण्यात आल्याने सिन्नर फाटा येथील बाजार समितीच्या उपबाजार आवार परिसरातच प्रतीकात्मक रॅली काढण्यात आली. यात परिसरातील शेतकरी ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी