31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपा सत्तास्थापन करणार नाही : चंद्रकांत पाटील

भाजपा सत्तास्थापन करणार नाही : चंद्रकांत पाटील

लय भारी न्यूज नेटवर्क 

मुंबई : महायुतीला जनतेनं बहुमत दिलं होतं. परंतु शिवसेनासोबत येणार नसल्यामुळे आम्ही सत्तास्थापन करणार नाही. शिवसेनेनं जनादेशाचा अपमान केला. आम्ही राज्यपालांकडे भाजपची भूमिका स्पष्ट केली. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर माध्यमांना दिली.

शिवसेना भाजपामध्ये सत्तास्थापनेवरू संघर्ष सुरु होता. शिवसेना मुख्यंमत्रीपदावर अडून बसल्यामुळे भाजपकडे बहुमत नव्हते. राज्यपालांनी सर्वात मोठ पक्ष भाजप असल्यामुळे सत्तास्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. मात्र, शिवसेना भाजपासोबत नसल्यामुळे भाजपने सत्तास्थापन न करण्याचा निर्णय घेतला. चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेना काँग्रेस,राष्ट्रवादी सोबत जात आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा. यावेळी आमदार आशिष शेलार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, विनोद तावडे उपस्थितीत होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी