31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयआरक्षणाबाबत भाजप दुतोंडी चेहऱ्याने वावरत आहे ; नवाब मलिक

आरक्षणाबाबत भाजप दुतोंडी चेहऱ्याने वावरत आहे ; नवाब मलिक

टीम लय भारी

मुंबई :- सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द केले आहे. मराठा समाला सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय मान्य नाही. त्यावरून मराठा समाज आणि संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावरून (Maratha reservation) सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपची (BJP) आरक्षणविरोधात वेगळी विचारधारा आहे. एक वेगळा दुतोंडी चेहरा असल्याची टीका नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे.

जेव्हा कधी आरक्षणाचा (Reservation) विषय येतो तेव्हा प्रत्यक्ष–अप्रत्यक्ष त्याचा विरोध करत राहतात. काही संघटना पुढे आणतात आणि आंदोलने करतात असा आरोपही नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मंडल आयोग आल्यानंतर भाजप (BJP) त्याला विरोध करत होती ही सत्य परिस्थिती आहे.

निराधार झालेल्या महिलांना ‘आधार’; रोहित पवार देणार रोजगार

नितीन गडकरी खूपच चांगला माणूस, पण… अशोक चव्हाणांची खंत…

Twitter has to comply with new IT rules if they have not been stayed, says Delhi High Court

आजच्या घडीला मराठा आरक्षण (Maratha reservation) असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल काही लोकांना ते स्वतः कोर्टात पाठवत आहेत आणि याप्रकारची परिस्थिती राज्यात निर्माण करत आहेत. कोर्टात एखादा निर्णय रद्द झाल्यावर राज्य सरकारच्या विरोधात वेगळी भाषा बोलायला लागतात ही भाजपची (BJP) दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला.

‘मराठा आरक्षणाच्याविरोधात भाजपच रसद पुरवत आहे’

मराठा आरक्षणाच्याविरोधात (Maratha reservation) भाजपकडूनच रसद पुरवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला होता. ‘वन मेरिट, वन नेशन’, ही संस्था मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) विरोधात आहे. या संस्थेचे सर्व प्रमुख हे भाजपचे (BJP) पदाधिकारी आहेत. या संस्थेने मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) विरोधात कोर्टात वकील नेमून लढा दिला. त्यामुळे लोकांनी आता खरा शत्रू कोण आहे, हे ओळखावे, असे त्यांनी म्हटले होते.

‘भाजपची मानसिकता संघ विचारधारेप्रमाणेच आरक्षण विरोधी’

भाजपची (BJP) मानसिकता संघ विचारधारेप्रमाणेच आरक्षण विरोधी आहे. मराठा आरक्षणाला (Maratha reservation) आमचा पाठिंबा आहे असा दिखावा करायचा आणि प्रत्यक्षात मात्र आरक्षण मिळू नये म्हणून मोहिमा चालवायच्या ही भाजपची (BJP) कार्यपद्धती आहे. याचे कारण असे की, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणविरोधी (Maratha reservation) लढाई लढणारे ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ या संघटनेचे थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कनेक्शन आहे. या संस्थेतील बहुसंख्य विश्वस्त हे आरएसएसशी संबंधित असून नागपूरचेच असल्याचा आरोप मध्यंतरी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी