35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयसर्व माफिया एकत्र येऊन महाराष्ट्र लुटत आहेत : भाजप

सर्व माफिया एकत्र येऊन महाराष्ट्र लुटत आहेत : भाजप

टीम लय भारी

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संजय राऊत, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, यांच्यावर सोमय्या यांनी निशाणा साधला आहे. सर्व माफिया एकत्र येऊन महाराष्ट्र लुटत आहेत, अशी टीका सोमय्या यांनी केली आहे (BJP leader Kirit Somaiya targets Mahavikas Aghadi government).

ठाकरे आणि पवार हे दोन माफिया एकत्र येऊन महाराष्ट्रात लूट करत आहेत. घोटाळा केलेला पैसा स्वतःच्या नातेवाईकांच्या नावावर करण्याचे काम ठाकरे आणि पवार सरकारच करू शकतात. असा टोला ही सोमय्या यांनी लगावला आहे.

पवारांच्या जावयांकडे इतके पैसे कसे ? किरीट सोमय्यांचा सवाल

किरीट सोमय्यांची ठाकरे सरकारवर खोचक टीका

अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली. देशमुख यांच्या अटकेवर भाष्य करताना सोमय्या म्हणाले, देशमुख यांना तोंड उघडावेच लागेल. त्यामुळे पवार आणि ठाकरे सरकरकडे वसुलीचे पैसे कोण, व कसे पोचवत आहे ते समोर येईल. ही एक क्रांती आहे आणि निश्चितपणे आणखी काही नावे समोर येतील. तसेच दिवाळीनंतर आणखी काही नव्या मंत्र्यांचे घोटाळे समोर येतील असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.

दिवाळीनंतर आणखी एका मोठ्या नेत्याचा घोटाळा समोर आणणार; किरीट सोमय्यांचा इशारा

Sharad Pawar had links with Dawood Ibrahim, says BJP leader Kirit Somaiya

अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखाना, दिल्लीची संपत्ती, गोव्यातील रिसॉर्ट व पार्थ पवार यांचे नरिमन पॉईंट येथील कार्यालय आयकर विभागाने जप्त केले आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्या पत्नी, दोन बहिणी, जावई, आणि मुलगा पार्थ यांची नवे पवार यांनी बेनामी मालमत्तेत टाकले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी