30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीयराज्यातील विमानतळांच्या प्रश्‍नांवर संयुक्त बैठका लवकरच, ज्योतीरादित्य शिंदेचे आश्वासन

राज्यातील विमानतळांच्या प्रश्‍नांवर संयुक्त बैठका लवकरच, ज्योतीरादित्य शिंदेचे आश्वासन

टीम लय भारी

मुंबई: महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या विकासासंबंधी व विमानसेवांच्या विस्तारासंबंधी राज्यात सध्या चर्चा सुरू आहेत. मात्र यावर नागरी उड्डाण मंत्रालय, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांची संयुक्त बैठक आयोजित करू असे आश्‍वासन केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले.(Jyotiraditya Shinde Joint meeting on airport issues in the state soon)

तसेच असोचेम संस्थेच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित हवाई वाहतुक परिषदेप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शिंदे यांची भेट घेऊन राज्यातील विमानतळांबाबत चर्चा केली. आणि चर्चे नंतर राज्यातील विमानतळांबाबत आणि त्यांच्या विकासासबंधी लवकरच यावर बैठका घेतल्या जातील असे आश्वासन त्यावेळी त्यांनी दिले.

ललित गांधी यांनी महाराष्ट्रातील विमानतळांचा विस्तार, हवाई सेवांचा विस्तार, प्रस्तावित विमानतळांची प्रलंबित कामे या विषयांची माहिती शिंदे यांना देऊन राज्यातील विमानतळांविषयीचे सविस्तर निवेदन सादर केले. कोल्हापूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, नागपुर येथुन नवीन हवाई सेवांचा प्रारंभ, विमानतळ विस्तारीकरण यावर प्राधान्याने लक्ष देण्याची विनंतीही केली. सोलापूर विमानतळावरील प्रवासी वाहतुक नियमित सुरू होण्यामधील अडथळे दूर करणे, पुणे मुंबई येथील नवीन विमानतळांच्या कामाची गती वाढविणे, अमरावती, अकोला, रत्नागिरी विमानतळ कार्यान्वित करणे या प्रश्नांवर मुख्यतः लक्ष केंद्रीत अशी विनंती गांधी यांनी शिंदे यांना केली.

दरम्यान कोल्हापूर विमानतळास छत्रपति राजाराम महाराजांचे नाव देण्याच्या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी व्हावी अशी मागणी यावेळी ललित गांधी यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

युक्रेनमध्ये अडकलेले 250 भारतीय विद्यार्थी परतले

आयकार विभागाच्या धाडीनंतर पुंन्हा सत्तेवर येण्याची सत्ताधiऱ्यांना वाटतेय भीती

राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेच्या ‘या’ नेत्याच्या घरी इन्कम टॅक्सची धाड

21-year-old student is the first Indian casualty of Putin’s war

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी