32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयशिवसेनेच्या 'या' दोन नेत्यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता

शिवसेनेच्या ‘या’ दोन नेत्यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता

टीम लय भारी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून जाधव यांच्या काही शेल कंपन्या उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.(Shiv Sena are likely to increase problems of these two leaders)

घरावर छापा मारला होता. आयकर विभागाने जवळपास चार दिवस जाधव यांच्या घरी ठिय्या मांडला होता. त्यांनी यावेळी काही कागदपत्रेही ताब्यात घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत जाधव यांच्या 12 हून अधिक शेल कंपन्या कॉर्पोरेट अफेअर्सने उघडकीस आणल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचेही चौकशीत समोर आले होते. त्याशिवाय कंपनी कायद्यानुसार या कंपन्यांमध्ये काही त्रुटीदेखील आढळून आल्यामुळे आता यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची दाट शक्यता आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जानेवारी महिन्यात यशवंत जाधव यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोव्हिड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लाँड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. त्याचबरोबर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत.

हे सुद्धा वाचा

मलिकांच्या अटकेला मुस्लिम जातीचा उल्लेख देण्याचा प्रयत्न, दरेकरांचा गंभीर आरोप

यशवंत जाधव यांच्यावर कारवाई झाली बकीच्यांवर कधी करणार बाबूभाई भवानजी

यशवंत जाधव यांच्या घरातून आयकर टीम परतली , महत्वाची कागदपत्रे जप्त

72 hrs later, I-T men leave Shiv Sena leader Yashwant Jadhav’s home

तपास यंत्रणेकडून मुंबई मनपातील शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी चौकशी करण्यात येत आहे. यशवंत चव्हाणांच्या घरी आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या नेत्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी