32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयमुंबई महापालिकेवर भाजप नेते प्रभाकर शिंदेंचा आरोप

मुंबई महापालिकेवर भाजप नेते प्रभाकर शिंदेंचा आरोप

टीम लय भारी

मुंबई : भाजप नेते प्रभाकर शिंदे यांनी मुंबई महापालिकेवर आरोप केले आहेत. पालिकेकडून सफाई कामगारांसाठीच्या घरांच्या योजनेत शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी केली होती. यात १८४४ कोटींचा भ्रष्टाचार झाला असून राज्य शासनाने चौकशी करावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे (BJP leader Prabhakar Shinde’s allegation against Mumbai Municipal Corporation).

मुंबई पालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेचे अनेक गैरव्यवहार सुरु आहेत. तसेच शिवसेनेने कामगारांसाठीच्या घरे बांधण्याच्या योजनेत सोडले नाही. असा आरोप आमदार मिहीर कोटे यांनी केला आहे.

Bigg Boss 15 : सलमान अफसना खानवर संतापला, म्हणाला…

UPI अॅपवरून क्रेडिट कार्डाचं बिल भरा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

शिंदे यांनी सांगितले की, मुंबईतील सफाई कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेतून मालकी हक्काची घरे देण्यात यावीत अशी मागणी भाजपा नगरसेवकांनी महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेकडे केली आहे. मात्र सत्ताधारी शिवसेनेने सफाई कामगारांना मालकीची घरे देण्याऐवजी आश्रय नावाच्या योजनेखाली सेवा निवासस्थानात ढकलण्याचे उद्योग सुरु आहेत. सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे देण्याऐवजी आश्रय योजनेतून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे प्रकार सुरु आहेत.

देवेंद्र फडणवीस ‘क्लीन चीट मास्टर’, भुजबळांची सडकून टीका

Dare You To Topple My Government: Uddhav Thackeray’s New Attack On BJP

१९८५ मध्ये लाड – पागे समितीने मुंबईतील सफाई कामगारांना हक्काची घरे देण्याची शिफारस केली होती. या योजनेत बांधल्या जाणाऱ्या घरांचा खर्च राज्य सरकार आणि मुंबई पालिकेने करावयाचा आहे. त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना १३० कामगारांना घरे दिली गेली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीही मुंबईतील सफाई कामगारांसाठी नवी गृह योजना राबविण्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेतून घरे बांधण्याचाच निर्णय घेतला.

मात्र मुंबई पालिकेत सत्तेत असलेली शिवसेना आश्रय योजनेखाली कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे काम करीत आहे. या योजनेखाली दिल्या गेलेल्या कंत्राटांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री , मुख्य सचिवांकडे केली आहे असेही श्री. शिंदे यांनी नमूद केले.

या घोटाळ्याची राज्य शासनाने चौकशी न केल्यास केंद्रीय दक्षता आयोगाकडे , लोकायुक्तांकडे तक्रारी दाखल करू , वेळ आल्यास न्यायालयातही जाऊ असा इशारा श्री . विनोद मिश्रा यांनी दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी