30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयअमली पदार्थांच्या तस्करीवरून भाजपा आमदार अतुल भातखळकरांचा गृहमंत्र्यांवर निशाणा

अमली पदार्थांच्या तस्करीवरून भाजपा आमदार अतुल भातखळकरांचा गृहमंत्र्यांवर निशाणा

टीम लय भारी

मुंबई : मुंबईत अमली पदार्थांची तस्करी सर्रास होत असताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे झोपले आहेत का? असा खोचक सवाल भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. मुंबईत क्रूझवर सुरु असलेल्या पार्टीवर धाड टाकत राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाच्या विशेष पथकाने अमली पदार्थ जप्त केले होते. याच मुद्यावरून भातखळकरांनी गृहमंत्र्यांवर टीका केली आहे (BJP MLA Atul Bhatkhalkar targets Home Minister over drug trafficking).

आपली जबाबदारी ओळखून  राज्यात वाढत चालेली गुन्हेगारी मुळासकट काढण्याचे सोडून ठाकरे सरकार केवळ टक्केवारी वसुली करण्यात मग्न आहे. असा आरोप भातखळकर यांनी केला आहे. मागील वर्षात अमली पदार्थ विरोधी पथकाने ४२ पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे. यात बॉलीवूड व उद्योग विश्वात वाढत चालेल्या ड्रग्स रॅकेटचे भांडाफोड करण्यात आले होते.

शिर्डीच्या साई संस्थानाकडून भाविकांसाठी नियमावली जाहीर

वंचितांना मदत करून वाढदिवस साजरा, भाजप पदाधिकाऱ्याचे कौतुकास्पद कार्य

एनसीबीने छापा टाकलेल्या मुंबईतील क्रूझवर अंमली पदार्थांची पार्टी चालू होती. यात अभिनेता शारुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आले होते. आर्यन सोबतच आणखी ८ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. मुंबई सारख्या शहरात इतकी देशविघातक कृत्ये होत असताना राज्याचा गृह विभाग केवळ बघ्याची भूमिका पार पाडत आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्सचे उत्पादन व तस्करी या विरोधात जोरदार कारवाई करणे अपेक्षित असताना ते सुद्धा केवळ गृह विभाग मात्र हॉटेल व बार मालकांकडून वसुली करण्यात धन्यता मानत आहे. असे भातखळकर म्हणाले.

अमली पदार्थांच्या तस्करीवरून भाजपा आमदार अतुल भातखळकरांचा गृहमंत्र्यांवर निशाणा

Navratri festival 2021 : गृहविभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव 2021 बाबत जारी केल्या मार्गदर्शक सूचना

BJP announces candidates for Maharashtra, Mizoram and Telangana assembly bypolls

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे, दिवसा ढवळ्या खून, बलात्कार, उद्योजक व राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमक्या देणे, अपहरण या आणि अशा गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालेले आहे. राज्याचे गृहमंत्री हे केवळ सुडाचे राजकारण करण्यात मग्न असल्यामुळे किमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तरी मुंबईतील वाढत चाललेली अंमली पदार्थ व ड्रग्स ची खुलेआम विक्री आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे असा खोचक सल्ला सुद्धा भातखळकर यांनी दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी