33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रनारायण राणे यांना अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी १५ दिवसांचा अल्टीमेटम!

नारायण राणे यांना अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी १५ दिवसांचा अल्टीमेटम!

टीम लय भारी

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेकडून नोटीस देण्यात आली आहे. महापालिकेच्या के वेस्ट विभागाकडून नारायण राणेंच्या आधिश बंगल्याला पुन्हा नोटीस पाठवण्यात आली आहे. पुढील 15 दिवसांत स्वत:हून अनधिकृत बांधकाम पाढा नाहीतर पालिकेला कारवाई करावी लागेल, असे पालिकेकडून या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. मुंबई पालिकेनं दोन वेळा राणेंच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यानंतर नारायण राणे यांच्या घराला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली होती.

माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नारायण राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले असल्याची तक्रार यापूर्वीच मुंबई मनपाला केली होती. आता मुंबई मनपाने नारायण राणे यांच्या बंगल्याची तपासणी करण्यासाठी नोटीस बजावली. मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत सेक्शन 488 नुसार बीएमसीने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना ही नोटीस पाठवण्यात आली.या प्रकरणी ते कोर्टात जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी