33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडी सरकार विरोधात धनगर समाजाचा एल्गार : हेमंत पाटील

महाविकास आघाडी सरकार विरोधात धनगर समाजाचा एल्गार : हेमंत पाटील

टीम लय भारी

मुंबई : धनगर समाज आरक्षण परिषदेच्या अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आळंदी येथे धनगर समाजाची बैठक पार पडली.  धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे. सत्तेत असणाऱ्या सर्व पक्षांचे सरकार आली व गेली पण धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लागला नाही. गेले अनेक वर्ष न्यायालयात धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. सरकार आपली बाजू मांडण्यास टाळाटाळ करत आहे.

राष्ट्रवादी व काँग्रेसने आम्हाला सत्ता द्या आम्ही आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यांनी अक्षरशः धनगर समाजाकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात धनगर समाजात प्रचंड रोष आहे. येत्या काही काळात जर धनगर समाजाला आरक्षण दिलं गेलं नाही तर, 23 मे रोजी आजच मैदान मुंबई येथे धनगर समाजाचा महामेळावा होणार असल्याचा हेमंत पाटील यांनी सांगितलं या मेळाव्याला महाराष्ट्रातून धनगर समाजाच्या अनेक कार्यकर्ते व नेते उपस्थित राहणार आहेत.

आळंदी मध्ये झालेल्या या समाजाच्या बैठकीला यशवंत संघर्षनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कुराडे, उपाध्यक्ष भागवत काटकर, नारायण दादा घोलप, योगिता काटकर ,सिद्धेश्वर सलगर, माऊली बुधवंत, खांडेकर साहेब, बोबडे साहेब, बाळासाहेब कवळसे, दगडे साहेब, सोलंकर इत्यादी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी