31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून नव्या वादाची ठिणगी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून नव्या वादाची ठिणगी

टीम लय भारी 

मुंबई : शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात हिंदुत्वाची व्होटबँक विकसित केली, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी कळस चढवला, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरुन टीकेचे मोहोळ उठले आहे(Chandrakant Patil statement sparked a new controversy).

या वक्तव्यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर आगपाखड केली आहे. चंद्रकांत पाटील आणि नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांना क्षुद्र म्हणून राज्याभिषेक नाकारणाऱ्या विचारसरणीचे आहेत. महाराजांचे राज्य जातीपाती, धर्माच्या पलीकडले होते, स्त्री सन्मान करणारे रयतेचे राज्य होते, असे अतुल लोंढे यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे नुकसान होणार !

ईडीची पुढची कारवाई नांदेडच्या नेत्यावर?, चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यातील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी उमेदवारांच्या निवडणूक तिकिटाबाबत भाष्य केले. तिकिट हे पक्षाचे असते. व्होट बँक पक्षाची असते. व्होटबँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक तयार केली. अलिकडच्या काळात ही व्होट बँक अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, मोदी यांनी त्यावर कळस चढवला असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलेचंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले की, चंद्रकांत पाटील यांनी असे वक्तव्य करून तारे तोडले आहेत. शिवरायांचा अवमान करणारी ही भाजपाची छिंदम प्रवृत्ती आहे.  व्होट बॅंकेच्या हिन राजकारणाशी शिवरायांचा संबंध जोडता? असा सवालही त्यांनी केला. शिवराय हे सद्विचारांचे प्रतिक आहेत व भाजपा कुविचारांचे- त्यामुळे तुलना पातकच असून पाटील यांनी माफी मागण्याची मागणी सावंत यांनी केली.

किरिट सोमय्यांच्या विरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल! : अतुल लोंढे

BJP will win 418 seats in 2024 Lok Sabha polls: Maharashtra BJP chief Chandrakant Patil makes big claim

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही यावरुन चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. कोणीही या वक्तव्याचं समर्थन करु शकत नाही. चंद्रकांत पाटील यांना इतिहासाची किती माहिती आहे हे तपासून पाहिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू समाजापुरतं मर्यादित ठेवण्याचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही महाराज हिंदूंची व्होट बँक वाटतात, त्यामुळे भाजपाला वाटणंही स्वाभाविक आहे, असे मिटकरी यांनी म्हटले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी