30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयचंद्रशेखर बावनकुळेंचं सोनिया गांधींना मराठीत पत्र, नाना पटोलेंना पदावरुन हटवण्याची केली विनंती

चंद्रशेखर बावनकुळेंचं सोनिया गांधींना मराठीत पत्र, नाना पटोलेंना पदावरुन हटवण्याची केली विनंती

टीम लय भारी
मुंबई:- प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महात्मा गांधी यांची हत्या म्हणण्याऐवजी ‘वध’ असा शब्दप्रयोग केला. ते नेहमीच असे वादग्रस्त वक्तव्य करीत असतात. त्यांना मनोरुग्णालयात पाठवावे लागेल. नाना पटोले यांच्यामुळे काँग्रेसची प्रतिमा मलीन होत आहे, असे भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.( Chandrasekhar Bavankule’s letter to Sonia Gandhi)

 चंद्रशेखर बावनकुळे  यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पत्र लिहलंय. नाना पटोले यांना पदावरून काढा, अशी मागणी बावनकुळे यांनी पत्रातून केलीय. मतभेद असले, तरी राष्ट्रीय हिताच्या वेळी सर्व पक्षांनी मतभेद विसरले पाहिजे. काँग्रेसही नाना पाटोलेची विकृतीस खपवून घेते हे सर्वांना खटकते आहे असे या पत्रात लिहीलय.

हे सुद्धा वाचा

भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष असल्यामुळेच पक्षाची संपत्ती अधिक आहे ,प्रविण दरेकर

वरळीतील जांबोरी मैदानाच्या नामांतरावरून भाजपने चढवला शिवसेनेवर हल्ला

वाईन विक्रीवरुन गोपीचंद पडळकर यांचे सरकारवर टीकास्त्र

“Keeping Our Word”: Sena Backs Manohar Parrikar’s Son In Message To BJP

सोनिया गांधींना लिहलेल्या पत्रात बावनकुळे यांनी असं म्हटलं आहे की, “भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सातत्यानं समाजविघातक वक्तव्य करून सामजिक शांतता बिघडवित आहेत. आपल्या पक्षासोबत आमचे राजकीय आणि वैचारीक मतभेद असले तरी राष्ट्राचे हित जिथे असते, तिथे सर्व प्रकारचे मतभेद विसरून आपण एकत्रित यावे, हा आपल्या समृद्ध लोकशाहीचा संस्कार आहे. त्याच भावनेतून आपणास हे पत्र लिहित आहे.”नाना पटोले यांनी अलीकडच्या काळात दोन वादग्रस्त विधान केली आहेत.

या विधानामुळं समाजमन संतप्त आहे. पटोलेंनी काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणारे विधान केलं होतं. त्यांच्या वक्तव्यामुळं समाजातील सर्व क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया आलीय. पटोलेंचा सर्वांनीच तीव्र निषेध केलाय.” “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नाना पटोलेंनी महात्मा गांधींच्या हत्येचा ‘वध’ असा उल्लेख केला. वध हा राक्षसांचा होत असतो. महापुरुषांचा नाही. ही सामन्य गोष्ट या जबाबदार व्यक्तीला समजू नये, ही अत्यंत खेदाची बाब आहे.” “या दोन्ही आक्षेपार्ह आणि अवमानकारक विधानाबद्दल नाना पटोलेंनी माफी देखील मागितलेली आहे. काँग्रेस पक्ष हा या देशातील जुना पक्ष आहे.

या पक्षाचा एक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर अपमान करतो आणि काँग्रेस पक्ष त्या प्रदेशाध्यक्ष विकृती खपवून घेतो, ही बाब सर्वांनाच खटकणारी आहे.” “पटोले हे अशा विकृतीच्या माध्यमातून समाजात अशांतता निर्माम करीत आहेत. अशा बेजबाबदार व्यक्तीवर आपण कठोर कारवाई करावी आणि त्यांन पदावरून तातडीनं बरखास्त करावं,” अशी विनंती बावनकुळे यांनी पत्रातून केलीय.

मी उत्पादन शुल्क मंत्री असताना ऑनलाइन दारू विक्रीचा प्रस्ताव आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार यांनीही याला विरोध दर्शविला होता. त्यामुळे हा प्रस्ताव नाकारला होता. शिवसेनेचे अनेक लोकप्रतिनिधी ऑनलाइन दारूविक्रीला परवानगी देण्याच्या मागणीसाठी माझ्याकडे आले होते. त्यामुळे संजय राऊत यांच्या भूमिकेला कोणताही अर्थ नाही. वाईन म्हणजे दारू नाही, हे पवारांनीच ठरवावे, त्यांचे हे बोलणे शोभणारे नाही. ते ज्येष्ठ मंत्री आहेत. अशी बेजबाबदार वक्तव्य पवारांनी करू नये, असेही चंद्रशेखर बावनकुळे  म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी