33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्र्यांची घोषणा; अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्या नातलगांना 5 लाखाची मदत

मुख्यमंत्र्यांची घोषणा; अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्या नातलगांना 5 लाखाची मदत

टीम लय भारी

मुंबई:- महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात पावसाने थैमान घातला आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्या नातलगांना 5 लाखाची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे (Chief Minister Uddhav Thackeray has announced help to the relatives of the deceased).

रायगड आणि साताऱ्यात ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत (Chief Minister Thackeray has also expressed his condolences).

Chief Minister Uddhav Thackeray announced help
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महापुराने केले होत्याचे नव्हते; पाहा : काळजाचा ठोका चुकविणारे फोटो

केंद्र सरकार फक्त आश्वासन देते; मदतीच्या नावाने बट्याबोळ

रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. काल दुपारी ही दुर्घटना घडली. आतापर्यंत तळीये दुर्घटनेत 38 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर साताऱ्यातील आंबेघर इथे दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला.

पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, गोवेले सुतारवाडी येथे भूस्खलन झाले आहेत. यामध्ये दरडीखाली 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जखमींवर उपचार सुरु आहेत. त्याआधी महाड तालुक्यातील तळीये गावात भूस्खल होऊन आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिकडे साताऱ्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या तिन्ही घटनांतील मृतांचा आकडा आता 89 वर गेला आहे (The death toll in all three incidents has now risen to 89).

राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिकांना आदेश, ‘पुरग्रस्तांना मदत करा’

Maharashtra rain fury: CM Uddhav Thackeray announces Rs 5 lakh ex-gratia, says ‘treatment of those injured will be borne by govt’

मृतांची आकडेवारी

तळीये, महाड – 38 मृतदेह हाती

आंबेघर, सातारा – १२ जणांचा मृत्यू

पोलादपूर, रायगड – 11 जणांचा मृत्यू

वाई, सातारा – 2 महिलांचा मृत्यू

पोसरे, रत्नागिरी – 17 जणांचा मृत्यू

कणकवली – दिगवळे, सिंधुदुर्ग – 1 महिलेचा मृत्यू

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी