टीम लय भारी
मुंबई : आपल्या कुटुंबियांसाठी गलिच्छ भाषा वापरणाऱ्यांविरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ पेटून उठल्या आहेत. वाद घालण्यासाठी विषय नसतील तरीही मी असले आरोप कोणत्याच कुटुंबाच्या सदस्यांवर करणार नाही असे म्हणत त्यांनी सत्तेत असणाऱ्यांना समज दिली आहे (chitra wagh been harassed with bad words like The wife of the rapist and the daughter of the rapist).
बलात्कार करणाऱ्यांची बायको व बलात्कार करणाऱ्यांची मुलगी अशा शब्दात त्यांना हिणवले गेल्याने चित्रा वाघ यांचा संताप अनावर झाला आहे. आमच्या बापाने हे आम्हाला शिकवलं नाही, असे म्हणत टीका करणाऱ्या व्यक्तीच्या वडिलांचे संस्कार त्यांनी दाखवून दिले आहेत.
सर्वदूर अंधार आहे त्यावर आधी दिवे लावा नंतर दुसर्यांचा अंधार पहा : चित्र वाघ
सदाभाऊ खोतांच्या मुलाने युवा आघाडीच्या अध्यक्षांवर उगारले शस्त्र
वाद घालण्यासाठी योग्य मुद्दे नसतील तर स्त्रीच्या बाईपणावर भस्य केलं जात तसेच तिच्या कुटुंबाला मध्ये ओढलं जातं. असे स्पष्ट मत त्यांनी ट्विटमधून मांडले आहे.
या भ्याड भेकडांना भीक न घालता कणखर बना, अन्यायाविरोधात पेटून उठा, मी तुमच्यासोबत आहे! आवाज उठवते आहे व नेहमीच उठवत रहाणार, असे त्यांनी राज्यातील सर्व स्त्रियांना बहिणी मानून त्यांना उद्देशून सांगितले आहे.
गोपीचंद पडळकर विजय वडेट्टीवारांना म्हणाले मांजर!
मला व माझ्या परीवारासाठी गलीच्छ भाषा वापरली जातीये तरी ही..
मी कुणा परीवारातील सदस्यांना बलात्कार्याची बायको बलात्कार्याची मुलं म्हणून कधीही हिणवणार नाही
कारण आमच्या बापाने हे आम्हाला शिकवलं नाही
विरोधकांकडे मुद्दे संपले कि तिच्या बाईपणाला व तिच्या परीवाराला टार्गेट केलं जात
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 8, 2021