31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयधुळ्यात शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर काँग्रेस मध्ये राजीनामा सत्र

धुळ्यात शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर काँग्रेस मध्ये राजीनामा सत्र

धुळे लोकसभा (Dhule Lok Sabha) मतदार संघासाठी काँग्रेसतर्फे माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव (dr Shobha Bachhav) यांची उमेदवारी दिल्यानंतर मालेगाव काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना भेटण्यासाठी मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आलेल्या डॉ.बच्छाव यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी डॉ. बच्छाव या कार्यालयाकडे येताच कार्यकर्त्यांनी परत जा परत जा अशी घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली. या नाराजी नाट्यानंतर डॉ.शेवाळे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाकडे विजयी होणारे एकनिष्ठ उमेदवार असताना देखील भाजप उमेदवाराला निवडणुकीत फायदा व्हावा या उद्देशाने नाशकात अडगळीत पडलेल्या नेत्याची धुळे लोकसभा मतदार संघात उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप डॉ. शेवाळे यांनी केला आहे.(Congress resigns after Shobha Bachhav’s candidature in Dhule)

धुळे लोकसभा मतदार संघात डॉ. शेवाळे यांच्यासह धुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सेनेर उमेदवारीसाठी इच्छुक होते. दोघांपैकी कोणालाही उमेदवारी मिळाली असती तर विजय निश्चित होता. मात्र पक्ष श्रेष्ठींनी आमचा विश्‍वासघात करीत अडगळीत पडलेल्या नेत्याला उमेदवारी देऊन निष्ठावंतांवर अन्याय झाल्याचा आरोप डॉ. शेवाळे यांनी केला.

२००९ पासून मी लोकसभेसाठी इच्छुक असून देखील पक्ष श्रेष्ठींनी दखल घेतली नाही. तरी देखील पक्षनिष्ठा ठेवत पक्ष वाढीसाठी काम केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा असताना व त्या दृष्टीकोनातून प्रयत्न करीत असताना पक्षाने धुळे व मालेगाव येथील उमेदवारांच्या नावाचा विचार न करता नाशिक स्थित उमेदवार लादला असल्याने मतदार संघात नाराजी पसरली आहे. याच नाराजीतून आपण पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे डॉ.शेवाळे सांगितले. धुळे लोकसभा मतदार संघातील लादलेला उमेदवार बदलला नाही तर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे ही डॉ. शेवाळे यांनी स्पष्ट केले. धुळे लोकसभा मतदार संघातील लादलेला उमेदवार बदलला नाही तर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे ही डॉ. शेवाळे यांनी स्पष्ट केले.

डॉ.शेवाळे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महिला काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस मंगला तलवारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. डॉ. शेवाळे हेच आमचा पक्ष असून ते जो निर्णय घेतील तोच आमचा निणर्य राहिल, असे युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संदीप निकम यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी