31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयनितेश राणे यांना दिपक केसरकर यांचा टोला, ‘नाहीतर पुन्हा जेलमध्ये जावे लागेल’

नितेश राणे यांना दिपक केसरकर यांचा टोला, ‘नाहीतर पुन्हा जेलमध्ये जावे लागेल’

टीम लय भारी

मुंबई:- भाजपचे आमदार नितेश राणे यांना आज कोर्टाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण आज नितेश राणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याचदरम्यान  नितेश राणे यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर येत आहे.( Deepak Kesarkar’s tola to Nitesh Rane)

यावरून शिवसेना नेते दिपक केसरकर यांनी नितेश राणे यांना टोला लगावला आहे. तुरुंगात जावे लागू नये म्हणून अनेकांची तब्येत बिघडते, मी या खात्याचा मंत्री होतो, तेव्हा स्वतः युनिट पाठवून चेकअप करायला लावायचो, कारण अनेकवेळेला अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांवर दबाव येण्याची शक्यता असते असे केसरकर यांनी म्हटले आहे. आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत राणे प्रकरणावर भाष्य केलं.

हे सुद्धा वाचा

नितेश राणे यांना पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी?

नितेश राणेंची गाडी पोलिसांनी अडवली, पोलीस आणि राणेंमध्ये शाब्दिक चकमक

नितेश राणेंच्या स्वीय सहाय्यकाला चार दिवसांची पोलिस कोठडी

Union Minister’s MLA Son Surrenders Before Court In Attempt To Murder Case

दिपक केसरकर म्हणाले, “प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र, मराठी यांची अस्मिता राखली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचे वंशज आहेत. त्यामुळे ठाकरे विरुद्ध राणे अशी तुलनाच होऊ शकत नाही. ठाकरे विरुद्ध भाजप अशीच तुलना होऊ शकते. एवढी कामगिरी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

” “राडा संस्कृतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटक, उद्योग व्यवसाय अडचणीत आले होते, पण मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहराज्यमंत्री जबाबदारी दिल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांतता निर्माण झाली. त्यामुळे पर्यटन व्यवसाय तेजीत आल्यावर दरडोई उत्पन्न वाढले होते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांतता असली पाहिजे,” असं दीपक केसरकर यांनी म्हटलं.

“तब्येत बिघडल्याचे कारण पुढे करून आमदार नितेश राणे रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची तब्येत बिघडली का? याची खात्री प्रशासनाने करणे गरजेचे होते. मी मंत्री असताना त्यांची तपासणी करून त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठविले होते. तशा प्रकारचे “डेअरिंग” आता कोण करू शकेलं का?”, असं म्हणत माजी गृहराज्यमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी घरचा आहेर दिला.तसेच दीपक केसरकर म्हणाले, “आम्ही सत्तेचा दुरुपयोग केला असता, तर राणेंना जामीन मिळालाच नसता. त्यामुळे विरोधकांकडून सुरू असलेली टीका योग्य नाही. मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने राणे यांना धक्का दिला. त्यामुळे त्याला राजकीय रंग नको. आतातरी नितेश राणेंनी चांगले वागावे, नाही तर त्यांना पुन्हा जेलमध्ये जावे लागेल.”

नितेश राणे यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवण्यात यावे. याच आधारे जामीन मिळावा, अशी मागणी नितेश राणे यांनी जामीन अर्जात केली. सध्या नितेश राणे हे प्रकृती अस्वस्थामुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी