31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयअखेर फडणवीसांनी फोडला बॉम्ब ...

अखेर फडणवीसांनी फोडला बॉम्ब …

टीम लय भारी

मुंबई : भाजप नेते आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचे म्हटले होते. अखेर फडणवीस यांनी शाब्दिक बॉम्ब फोडला आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर फडणवीसांनी शाब्दिक बॉम्ब फोडले आहे (Devendra Fadnavis made serious allegations against Nawab Malik).

मलिक यांनी १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला आहे. ‘या बॉम्बस्फोटात मुंबईकरांच्या चिंधड्या उडताना आम्ही पहिले, आणि हे कृत्य ज्यांनी केले यांच्यासोबत तुम्ही व्यवहार करता. अशा एकच नव्हे तर ५ प्रॉपर्टी मला सापडल्या आहेत. यातील ४ प्रॉपर्टीमध्ये १०० टक्के अंडरवर्ल्डचा अँगल आहे, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे दहा निष्पाप बालकांचा नाहक जीव गेला – फडणवीस

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा २३ वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत निघणार!

त्याचबरोबर या प्रकरणाशी संबंधित असेलेले सर्व पुरावे तपास संस्थांना देणार. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही या बाबत्तचे पुरावे देणार, यामुळे त्यांनाही कळेल की आपल्या मंत्र्यांनी काय दिवे लावले आहेत. असे ही देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले. फडणवीस यांनी पत्रकार परिषददेत मलिकांवर हे गंभीर आरोप केले आहेत.

Devendra Fadnavis wrote a letter to Uddhav Thackeray : नेहमी घसा फोडून टाहो फोडणा-या फडणवीसांनी लिहिले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र

Devendra Fadnavis’s “Underworld Links Proof” Against Maharashtra Minister

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी