34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडे आघाडीवर, पंकजाताई पिछाडीवर

धनंजय मुंडे आघाडीवर, पंकजाताई पिछाडीवर

टीम लय भारी

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे या भाऊ – बहिणीमध्ये सतत स्पर्धा सुरू असते. दोघांमध्ये अधिक प्रभावी कोण या मुद्द्यावर जनतेमध्येही सतत उत्सुकता असते ( Dhananjay Munde and Pankaja Mumde compete eachother) .

विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी घसघशीत मते मिळवून पंकजाताई मुंडेंवर मात केली होती ( Dhananjay Munde defeat Pankaja Munde in Maharashtra assembly election ). त्यानंतर आता आणखी एका बाबतीत धनंजय मुंडे यांनी पंकजाताईंवर मात केली आहे. ट्विटरवर पंकजाताई मुंडे आतापर्यंत आघाडीवर होत्या. पण नुकतेच धनंजय मुंडे यांनी पंकजाताईंना पिछाडीवर टाकले आहे.

Dhananjay Munde and Pankaja Mumde compete eachother
पंकजाताई मुंडे यांच्या ट्विटरवर अकाऊंटवर ५ लाख १८ हजार चाहते आहेत
Dhananjay Munde and Pankaja Mumde compete eachother
धनंजय मुंडे यांचे ट्विटर अकाऊंटवर ५ लाख २४ हजार चाहते आहेत

पंकजाताईंना ट्विटरवर ५ लाख १८ हजार चाहते आहेत (फॉलोअर्स), तर धनंजय मुंडे यांनी हा आकडा ओलांडला आहे. त्यांचे ५ लाख २४ हजार चाहते झाले आहेत ( Dhananjay Munde more popular on Twitter ).

हे सुद्धा वाचा

धनंजय मुंडेंचे बंगले नाना पटोले, वर्षा गायकवाडांनी घेतले; मुंडेंची मात्र पंचाईत

धनंजय मुंडेंना पीएने दिली अनोखी भेट

Corona update :  धनंजय मुंडे जिंकले, कोरोना हरला!  

शरद पवारांसमोर धनंजय मुंडेंचे ‘आयएएस’स्टाईल प्रेझेंटेशन; उद्धव ठाकरे म्हणाले, तगडा मंत्री !

शरद पवारांनी धनंजय मुंडेंना ‘या’ कारणास्तव दिले सामाजिक न्याय खाते

सन २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचा राजकीय वारसा पंकजाताईंकडे आला. कै. मुंडे यांच्या निधनानंतर काही महिन्यांतच विधानसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळी पंकजाताई निवडून आल्या होत्या. या काळात त्यांच्या ट्विटर अकाऊंटलाही भरघोस प्रतिसाद मिळाला होता.

पंकजाताईंचे त्यावेळी ट्विटरवर साधारण ३ लाख चाहते होते, त्यावेळी धनंजय मुंडे यांच्या चाहत्यांची संख्या अवघी १ हजार होती. कासव गतीने मुंडे यांच्या ट्विटरचा प्रवास सुरू होता. पण पंकजाताईंची संख्या सशाच्या गतीने वाढत चालली होती.

Mahavikas Aghadi

विशेष म्हणजे, धनंजय मुंडे यांचे ट्विटर अकाउंट २०१० मध्ये तयार केलेले आहे, तर पंकजताईंचे ट्विटर अकाउंट २०१३ मध्ये सुरू करण्यात आलेले आहे. परंतु कै. मुंडे निधनानंतर पंकजताईंचे ट्विटर वरील फॉलोवर्स झपाट्याने वाढले आणि धनंजय मुंडेंचे ट्विटर खाते मागे पडले होते.

सन २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा विजय झाला. पंकजाताई पराभूत झाल्या. तरीही ट्विटरवर पंकजाताईच आघाडीवर होत्या. नव्या सरकारमध्ये धनंजय मुंडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री झाले. अलिकडे त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. ‘कोरोना’च्या काळातही धनंजय मुंडे यांनी कामाचा झपाटा चालूच ठेवला.

संकटे, विपरीत परिस्थिती, अडचणी अशा खाचखळग्यांमधूनही धनंजय मुंडे सतत चालत असतात. त्यांचा स्वभाव व कार्यपद्धत लोकांना आता ठाऊक झालेली आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या एका समर्थकाने ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी