29.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
HomeराजकीयVIDEO : टरबूज्या, चंपा असे कुणी म्हटले तर पलटवार करा; चंद्रकांतदादांचा कार्यकर्त्यांना...

VIDEO : टरबूज्या, चंपा असे कुणी म्हटले तर पलटवार करा; चंद्रकांतदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला

टीम लय भारी

मुंबई : टरबुज्या, चंपा, कुत्र्या असा कोणी शब्दप्रयोग केला तर खपवून घ्यायचे नाही. पलटवार केला पाहीजे, असे ‘मार्गदर्शन’ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले ( Chandrakant Patil appeal to BJP workers).

भाजप कार्यकारिणीच्या बैठकीचे सोमवारी आयोजन केले होते. त्यावेळी चंद्रकांतदा पाटील यांनी कार्यकर्त्यांना हा ‘मोलाचा सल्ला’ दिला. ते म्हणाले की, कोणावरही केलेले स्टेटमेंट खपवून घ्यायचे नाही. कुणी टरबुज्या म्हणतो. कुणी चंपा म्हणतो. पलटवार केला पाहीजे.

ते पुढे म्हणाले की, दोन दिवसांत मी काही स्टेटमेंट केली. ती त्यांना सहन झाली नाहीत. झोंबली. त्यांच्या ( विरोधकांच्या ) एका कार्यकर्त्याने अतिशय खालच्या पातळीवरील – कुत्रा म्हणणारी एक पोस्ट टाकली. सगळी यंत्रणा मी कामाला लावली. दोन दिवसांत पोस्ट मागे घ्यावी लागली. फोनवरून त्यांनी विनवण्या केल्या. तुम्ही खालच्या स्तरावर जाऊन कुत्रा म्हणता ? अशा शब्दांत चंद्रकांतदादांनी समाचार घेतला.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र भाजपला केंद्राकडून मिळाले ‘हे’ कानमंत्र!

अजितदादा पहिल्यांदाच गेले ‘मातोश्री’वर

उद्धव ठाकरेंच्या जन्मदिनी भाजपाकडून अपशकुन

भाजप व महाविकास आघाडीच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून एकमेकांच्या विरोधातील नेत्यांवर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. यावरून वारंवार वादंगही झडत असते. या पार्श्वभूमीवर आपल्यावर कुणी खालच्या पातळीवर टीका केली की, त्यांच्यावर पलटवार करा असा सल्ला चंद्रकांतदादांनी दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी