राजकीय

धनंजय मुंडेंनी रोहित पवारांना दिली जबरदस्त भेट

टीम लय भारी

अहमदनगर : सामाजिक न्याय विभागाच्या जामखेड जामखेड येथील ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या १०० विद्यार्थी क्षमतेच्या संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या हस्ते आज करण्यात आले. ऊसतोड कामगारांचे महाराष्ट्रात मुला-मुलींचे दुसरे वसतिगृह जामखेड येथे सुरू केल्याने परिसरातील ऊसतोड कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यास बळ मिळणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले. शासनाच्या विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थीं यांना लाभ मंजूरी आदेश वाटपही यावेळी धनंजय मुंडे यांच्या हस्ते देण्यात आले. (Dhananjay Munde gave a great gift to Rohit Pawar)

मंत्री धनंजय मुंडे  म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानिक मूल्यांवर राज्याचा सामाजिक न्याय विभाग कमी करत आहे. ऊसतोड कामगारांची मुलांनी उच्च शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे. यासाठी शासनाने मागील वर्षी संत भगवानबाबा वसतिगृह योजना सुरू केली.विशेष सहाय्य योजनेच्या माध्यमातून शासनाने वंचित, गरजू लाभार्थ्यांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून दिली,असेही धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सांगितले.

याप्रसंगी आमदार रोहित पवार, कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले, समाजकल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, अहमदनगर सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, कर्जत येथे मिशन वात्सल्य अंतर्गत कोरोना मुळे कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल व विधवा झालेल्या महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी मिशन वात्सल्य बाल संगोपन मेळावा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. बाल संगोपन मेळाव्यास शासनाचे महसूल, ग्रामविकास, पशुसंवर्धन, कृषी, शालेय शिक्षण, महिला बालकल्याण व स्वयंसेवी संस्था, सहभागी झाल्या होत्या.


हे सुद्धा वाचा :

 

धनंजय मुंडे यांचा कल्पक उपक्रम, सामान्य लोकांच्या योजना तळागाळात पोचविणार !

रेणू शर्माने धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल केले, अन् पुन्हा अडचणीत आली

मास्टर ब्लास्टर सचिनच्या मुलीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

ईदच्या पार्श्वभूमीवर समाज विघातक व्यक्तींवर करडी नजर ठेवा, वंचित बहुजन आघाडीचे आवाहन

VIDEO : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या वादानंतर अमोल मिटकरींचे पहिले भाष्य

VIDEO : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या वादानंतर अमोल मिटकरींचे पहिले भाष्य

Newsmaker | Dhananjay Munde, the NCP minister dogged by ‘family fights’ & ‘extortion

Pratiksha Pawar

Recent Posts

अजित पवार चंबळच्या खोऱ्यातून आलेत, बारामतीचा करणार बिहार !

अजित दादा, काय करून ठेवलंय तुम्ही हे. अहो, बारामतीचा अख्ख्या देशात नावलौकीक होता. विकास म्हणजे…

23 mins ago

नारळपाणी पिण्याचे फायदे

नारळपाणी म्हणजे उन्हाळ्यातील एक प्रकारचं अमृतचं पण नारळपाणी आपण फक्त उन्हळ्यातच नाहीतर बाकीच्या ऋतूंमध्ये देखील…

2 hours ago

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

18 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

18 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

18 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

18 hours ago