30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयधनंजय मुंडे म्हणतात, मला कामे करू द्या !

धनंजय मुंडे म्हणतात, मला कामे करू द्या !

मंत्री झाल्यानंतर किंवा एखादे मोठे पद मिळाल्यानंतर सत्कार सोहळे होतात, कौतुक सोहळे होतात. मात्र हे कुठेतरी थांबवून खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात करावी लागते. असे धाडस किंवा हिंमत फार कमी आणि जबाबदार लोक दाखवतात. धनंजय मुंडे त्यातीलच एक आहेत. त्यांनी आता सत्कार सोहळे नकोत, मला काम करू द्या, असं थेट आवाहन बीडवासीयांना केले आहे. साधारणपणे मंत्रिपद मिळाल्यानंतर अनेकांना कायम समारंभात मिरवणे आणि सत्कार स्वीकारण्यातच धन्यता वाटते. याला कृषिमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा अपवाद ठरला आहे. कारण त्यांनी हारतुरे नकेत, निवेदने द्या, असे आवाहन करत वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

आतापर्यंत कृषिमंत्री म्हणून धनंजय मुंडे कामगिरी उजवी राहिली आहे. ते कायम शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिलेले दिसून आले आहेत. आता त्यांच्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारीही आली आहे. दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांची नियुक्ती झाली आहे. याचा बीडवासींयांना मोठा आनंद आणि कौतुकही आहे. म्हणूनच पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यात प्रवेश करताच त्यांनी आष्टीपासून गावागावातील सत्कार टाळत आणि फक्त निवेदने स्वीकारत बीडच्या दिशेने प्रवास केला.

धनंजय मुंडे म्हणजे आपला हक्काचा माणूस म्हणत त्यांचा सत्काराची तयारी गावागावात सुरू झाली होती. पण धनंजय मुंडे यांनीच हार तुरे आणि सत्कार सोहळ्यांना नकार देत मला काम करू द्या, असे आवाहन सर्वांना केले आहे. हे एवढ्यावरच थांबलेले नाही तर हारतुऱ्यांऐवजी मला निवेदने द्या, आणि कामे करून घ्या, असे आवाहन ते करत आहेत. मला निवदने द्या म्हणणारा मंत्री आणि पालकमंत्री बीड जिल्ह्याला लाभल्यामुळे बीडवासीय सुखावले आहेत. आतातर धनंजय मुंडे यांच्या गाडीची डिक्की पुष्पगुच्छ, हार यांच्याऐवजी निवेदनांच्या थप्पीवे भरलेली दिसत आहे.

काही दिवसांपासून महाराष्ट्रात जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्याचे फॅड सुरू झाले आहे. पण धनंजय मुंडे गाडीतून उतरून फुलांनी भरलेल्या जेसीबी बाजूला काढायला लावल्याचे सर्वांनी पाहिले. या वेगळ्या प्रकाराने बीडवासीय भारावून गेले आहेत. बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी अहमदनगर येथील ‘शब्दगंध’ या साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आणि बीडकडे रवाना झाले. तेव्हा आष्टी तालुक्याच्या हद्दीपासून गावोगावी लोक रस्त्यावर उतरून त्यांच्या स्वागतासाठी उभे असल्याचे दृश्य दिसत होते.

हे ही वाचा

…तरच अजित पवार मुख्यमंत्री होतील; छगन भुजबळांचं जाहीर वक्तव्य

अजितदादांच्या ‘टोपी’ची हवा; जोडला अखंड महाराष्ट्र माझा !

प्रभाकर देशमुख यांनी जयकुमार गोरे यांना काढले सोलून !

धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील दौला वडगाव, चिंचपूर, धामणगाव, अमळनेर, म्हसोबची वाडी, हातोला, जवळागिरी, गणेशगड, लिंबा देवी फाटा अशा अनेक ठिकाणी नम्रतापूर्व सत्कार नाकारून केवळ निवेदने स्वीकारली. एवढेच नाही तर लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत त्यामुळे निवेदने द्या आणि तुमचे प्रश्न सोडवा, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत आष्टी-पाटोदा-शिरूरचे आमदार बाळासाहेब आजबे, बीड जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत, आष्टीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, विठ्ठल अप्पा सानप यांसह अनेक पदाधिकारी होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी