27 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरराजकीय...तरच अजित पवार मुख्यमंत्री होतील; छगन भुजबळांचं जाहीर वक्तव्य

…तरच अजित पवार मुख्यमंत्री होतील; छगन भुजबळांचं जाहीर वक्तव्य

राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच चर्चेत असतात. अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होतील असे बोलले जात होते. मात्र सध्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री झाले. हे फक्त महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेलं पाहायला मिळत आहे. अशावेळी अजित पवार कधी मुख्यमंत्री होतील याकडे अजित पवार गटातील आणि राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी याबाबत जाहीर वक्तव्य केलं आहे. (7 ऑक्टोबर) नाशिकमध्ये शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते.

काय म्हणाले छगन भुजबळ

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे अजित पवारांचं याआधी बऱ्याचदा बोलून झालं आहे. मात्र हा दिवस कधी उजडेल याकडे नजरा लागल्या आहेत. यावर आता छगन भुजबळ यांनी मौन सोडलं आहे. ते म्हणाले की, “एक एक आमदार हा जर तीन तीन लाख जनतेचं प्रतिनिधित्व करतो. तर 50 ते 55 आमदार हे दीड ते दोन कोटी जनतेचे प्रतिनिधि करणारे आहेत. हे जर सर्व अजित पवारांच्या बाजूने आहेत तर न्यायचा तराजू हा अजित पवार यांच्या बाजूने असणार आहे,” असे भुजबळ म्हणाले.

हेही वाचा 

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने मांडला युक्तिवाद; काय आहेत युक्तिवादाचे मुद्दे?

पीक विमा भरपाई करा नाहीतर… कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी दिला सूचक इशारा

राष्ट्रवादीने पाडला मराठीचा मुडदा

45 आमदारांची संख्या ही 90 आमदारांपर्यंत पोहचावी 

“सर्व म्हणतात की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत. मात्र अजित पवार कसे मुख्यमंत्री होतील. स्टेजवरील सर्व लोकांनी झटलं पाहिजे. सर्वांनी काम केलं पाहिजे. 45 आमदारांची संख्या ही 90 आमदारांपर्यंत कशी होईल. याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. तेव्हाच अजित पवार मुख्यमंत्री होतील.” असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी जबाबदारी उचलावी 

केवळ अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत. एवढंच बोलून चालणार नाही तर त्यासाठी काम केलं पाहिजे. नुसतं म्हणून काही होणार नाही. ही शक्ति आपण त्यांच्या मागे उभी करण गरजेचं आहे. ते मुख्यमंत्री होण्यासाठी त्याची जबाबदारी सर्वांनी उचलावी, नाशिक येथील शेतकरी संवाद या कार्यक्रमात बोलत असताना छगन भुजबळ यांनी जाहीर वक्तव्य केलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी