31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयश्रेय घेण्याचा आचरटपणा करु नये - राज ठाकरे

श्रेय घेण्याचा आचरटपणा करु नये – राज ठाकरे

टीम लय भारी
मुंबई:- मराठी पाट्यांवरुन श्रेयवादाची लढाई, दुकानांच्या पाट्यांवर मराठीशिवाय कोणतीही भाषा नको, राज ठाकरेंचा इशारा राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात असाव्यात या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मंजूरी देण्यात आली.  दुकानांच्या पाट्यांवर इंग्रजीत नाव मोठ्या अक्षरात लिहलं जात असल्याचं लक्षात आलं आहे. पण यापुढे दुकानांच्या पाट्यांवर इंग्रजी अथवा इतर भाषेत जेवढ्या मोठ्या अक्षरात नाव लिहलं जाईल तेवढ्याच मोठ्या अक्षरात मराठीत नाव लिहणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.( Don’t be rude to take credit – Raj Thackeray)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये. परंतु 2008, 2009 साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या.

हे सुद्धा वाचा

मनसेला धक्का, विदर्भातील नेते अतुल वंदिले राष्ट्रवादीच्या गळाला!

बऱ्याच वर्षांनी का होईना कुंभकर्णाची झोप मोडली;मराठी पाट्यावरून मनसेचा टोला!

महापालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज; अमित ठाकरे यांचा नाशिक दौरा

Court Issues Non-bailable Warrant Against Raj Thackeray in 2008 Case

काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय गेतला. तेव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांना मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये.

त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच असंही राज ठाकरेंनी आपल्या पत्रकात म्हटलं आहे.आणि महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन. सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंमबलबजावणी नीट करा. राज ठाकरे यांनी या निर्णयाबद्दल राज्य सरकारचं अभिनंदन केलं आहे, पण याचं श्रेय बाकी कुणीही लाटण्याचा आचरटपणा करु नये असंही म्हटलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी