31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
HomeराजकीयBreaking : एकनाथ खडसेंची संपत्ती ईडीने जप्त केली

Breaking : एकनाथ खडसेंची संपत्ती ईडीने जप्त केली

टीम लय भारी

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ईडीने एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील संपत्ती जप्त केली आहे. ईडीने एकनाथ खडसे यांची एकूण ५ कोटी ७३ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे (Eknath Khadse property was confiscated by the ED).

भोसरी एमआयडीसी जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणात माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली होती. गेल्या महिन्यात खडसेंची तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी ईडीकडून केली जात होती. एका प्रकरणात खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसेंवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

एकनाथ खडसे यांची साडेसहा तास चौकशी

ईडीचा फास एकनाथ खडसेंभोवती : जावई अटकेत

एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील ५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात एकनाथ खडसेंची चौकशी केली जात असतानाच ही कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे.

KhadseVsFadanvis : गोपीचंद पडळकरांची उमेदवारी, अन् एकनाथ खडसेंचा तिळपापड

[EXCLUSIVE] Bhosari land scam: Registry dept staffer says Khadse’s son-in-law pressurised him

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे (It is alleged that the land was purchased at a much lower market value than the Ready Reckoner rate).

Eknath Khadse property was confiscated by the ED
ईडीने एकनाथ खडसे यांची एकूण ५ कोटी ७३ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली

हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी १२ एप्रिल, २०१६ रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो.

भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. खडसे यांच्या जावयाला ईडीकडून करण्यात आलेली असून, सध्या त्यांची चौकशी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी खडसेंसंदर्भातील झोटिंग समितीचा गोपनीय अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान हा अहवाल सापडला असून या अहवालात एकनाथ खडसेंनी पदाचा गैरवापर केल्याचे म्हटले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी