34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयमी आणि मुख्यमंत्री मित्र आहोत! देवेंद्र फडणवीसांचं प्रांजळ उत्तर

मी आणि मुख्यमंत्री मित्र आहोत! देवेंद्र फडणवीसांचं प्रांजळ उत्तर

टीम लय भारी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे आणि अजित पवार यांच्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही वक्तव्य केली आहेत. जी त्यांच्या आजवरच्या नात्यावर प्रकाश टाकतात. (Fadanvis talking about uddhav thackeray, raj thackeray and ajit pawar)

मनसेबरोबर युती करणार का असे विचारल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत. त्यांच्या पूर्वी भेटी झाल्या आहेत. ज्यांना आमची भूमिका पटेल त्यांच्या सोबत जाण्यासाठी आमची हरकत नाही. आम्ही अनेक पक्ष सोबत घेतले आहेत जर ती वेळ आली तर मनसे चा सुद्धा विचार करु.

कुठे जाहीर मुस्कटदाबी आणि कुठे सोबत घेतलेले दोन घास, चित्रा वाघ यांचे कुत्सित ट्विट

आईविना बछड्यांची पहिली शिकार, वन प्रबंधकांची चिंता मिटली

अजित पावरांबद्दल बोलताना मात्र त्यांनी सौम्य शब्दात मिश्किल टीका केली आहे. ते म्हणाले जुलै महिन्यात वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहायला का आवडणार नाही? याबाबत अजित पवार अधिक बोलू शकतील.

यावेळी देवेंद्र फडणवीस असेही म्हणाले की, अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचे होते पण त्यांची संधी बऱ्याचदा हुकलीये. पण आता त्याबद्दल के बोलायचे. मात्र अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे का असे विचारताच देवेंद्र फडणवीसांनी विषय बदलला. अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदापेक्षाही मोठे प्रश्न सध्या राज्याला भेडसावत आहेत.

अजित पवार यांच्याशी आपले नाते कसे आहे यावर स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले प्रश्न नात्याचा नाही. एका वृत्तपत्राने आम्हाला दोघांना एकमेकांविषयीचा लेख मागितला होता. आता एवढी वर्षे अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत म्हणजे त्यांचं काही ना काही कर्तृत्व तर नक्कीच असणार. वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं आहे. त्यांची कामाची एक वेगळी शैली आहे.

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या विरोधात बोलल्याप्रकरणी एस टी कर्मचारी निलंबित

Fadanvis
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे आणि अजित पवार यांच्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही वक्तव्य केली आहेत.

 

Maharashtra: Devendra Fadnavis, Pravin Darekar embark on three-day tour to flood-hit areas

काही गोष्टींबद्दल आमचं दुमत नक्कीच असेल, काही गोष्टींबद्दल विरोधही असेल. पण त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान मान्य करणं ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. त्यांनीही माझ्या कार्याविषयी त्यांना जे वाटतं त्याबद्दल लेख लिहिला आहे. त्यापलीकडे याकडे पाहण्याची गरज नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही खास मित्र होतो असे म्हणत उद्धव ठाकरेंबद्दलही देवेंद्र फडणवीसांनी मत मांडले आहे. पूर्वी आम्ही बऱ्याचदा फोन वरून बोलायचो. आताही मी त्यांना केव्हाही कॉल करू शकतो. आमचे व्यक्तिगत संबंध स्नेहाचे आहेत असे फडणवीस यावेळी म्हणाले.

मी त्यांना वाढदिवसाच्या दिवशीही फोन करून शुभेच्छा दिल्या. आम्ही जरी राजकीय विरोधक असलो तरी गेल्या 25 वर्षांपासून आम्ही मित्र आहोत. सध्याच्या काळात उद्धव ठाकरे यांनी त्यांची दिशा बदलली जरी असली तरी मित्रत्वाच्या नात्याने मी त्यांना केव्हाही कॉल करू शकतो, असे फडणवीस म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी