28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपरिवहनमंत्री अनिल परब यांच्या विरोधात बोलल्याप्रकरणी एस टी कर्मचारी निलंबित

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या विरोधात बोलल्याप्रकरणी एस टी कर्मचारी निलंबित

टीम लय भारी
यवतमाळ : परिवहन मंत्री अनिल परब आणि महाविकास आघाडी विरोधात सोशल मीडियावर टीका केल्याचा आरोप करत एस टी वाहन वाहक यास निलंबित करण्यात आलेले आहे. (Suspension order against ST bus conductor)

प्रवीण ज्ञानेश्वर लढी असे या वाहकाचे नाव आहे. एस टी कर्मचाऱ्यांच्या खासगी व्हाट्सएप ग्रुप वर प्रवीण यांनी स्फोटके वाहून नेणाऱ्या वाहकाबाबत उल्लेख केला असून त्याविषयी आपलं मत मांडले आहे.

सरकार विरोधात विरोधकांत एकमत

 

आपले कर्तव्य बजावून आमदार भास्कर जाधव यांची मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त अजब भेट

याविषयी पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी ही तक्रार एनसी (अदखलपात्र) ठरविली, तर एसटी महामंडळाने चौकशी करून कारवाई केली. यवतमाळ आगाराचे वाहतूक निरीक्षक एस.एस. राठोड यांनी या संदर्भातील अहवाल सादर केला आहे. त्यात तपासणी कामात प्रवीण लढी सहकार्य करीत नाहीत तर हा अपराध गंभीर स्वरूपाचा आहे असेही म्हंटले आहे.

Suspension
परिवहनमंत्री अनिल परब यांच्या विरोधात बोलल्याप्रकरणी एस टी कर्मचारी निलंबित

 

‘आपण महाराष्ट्राची महावसुली खंडणीखोर चोरटोळी अंबानीच्या घराशेजारी स्फोटके ठेवायला ड्रायव्हर मिळाला. ऑक्सिजन टँकरसाठी ड्रायव्हर मिळत नाही. १०० कोटी वसुली सरकार’ असा तो मजकूर होता. वाहतूक निरीक्षकांनी जो अहवाल सादर केला त्यात असे लिहिले आहे.

निलंबन काळात प्रवीण लढी यांनी रोज सकाळी ठीक 10 वाजता यवतमाळ आगार प्रमुखांकडे हजेरी लावायची आहे. प्रसंगी विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी या प्रकरणी अनभिज्ञ असल्याचे समजते. चौकशी करून स्पष्टीकरण देतो असे त्रोटक उत्तर श्रीनिवास जोशी यांनी दिले आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले आमदार रोहित पवार

Maharashtra: MSRTC losses now Rs 6.5k crore, fuel hike increasing the hit, says Anil Parab

एस टी च्या आजवरच्या इतिहासात ही पहिलीच कारवाई झालेली दिसते दरम्यान एसटी संघटना याविरोधात आंदोलन करणार असल्याचे समजते.

या निलंबनाच्या निमित्ताने लोकशाही असलेल्या आपल्या देशात आवल्याच सहकाऱ्यांसमवेत साधे व्यक्त होण्याचे किंवा आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य नाही काय हा प्रश्न पुन्हा उपस्थित होतो. खरेतर वाहकाला असे का व्यक्त व्हावेसे वाटले याबाबत चौकशी व्हावयाला हवी.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी