32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयफडणवीसांनी राज्याला मदत मिळावी म्हणून केंद्राला पत्र लिहावं : रोहित पवार

फडणवीसांनी राज्याला मदत मिळावी म्हणून केंद्राला पत्र लिहावं : रोहित पवार

टीम लय भारी

मुंबई :- तौत्के चक्रीवादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्रसह इतर दोन राज्यात ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानातून गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि मदतही फक्त गुजरात राज्यासाठी जाहीर केली. राज्यसरकार तर नुकसानग्रस्तांना मदत करेलच, परंतु केंद्राकडून राज्याला मदत मिळवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला पत्र लिहावे असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिला (NCP MLA Rohit Pawar advised Devendra Fadnavis to write a letter to the Center).

तौत्के चक्रीवादळाने गुजरात आणि महाराष्ट्रासह इतर दोन राज्यातही मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानातून गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच फक्त गुजरात राज्यासाठी मदत ही जाहीर केली. त्यामुळे महाराष्ट्रसह इतर ही दोन राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल, अशी सर्वसामान्य जनतेला अपेक्षा आहे. यासाठी विरोधी पक्षनेत्यांनीही केंद्राला पत्र लिहावे, असा सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे (Opposition leaders should also write a letter to the Center, Rohit Pawar has suggested).

पश्चिम बंगाल लढवलं की मोदी रडतील, खासदाराची वाणी खरी ठरली

नवाब मलिकांचा तौक्ते वादळाच्या पॅकेजबाबत फडणवीसांना खोचक टोला

Covid-19: Moderna refuses to supply vaccines directly to Punjab, says will only deal with Centre

केंद्राकडून राज्याला मदत मिळावी

महाविकासआघाडी सरकार बरोबरच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. राज्यसरकार तर नुकसानग्रस्तांना मदत करेलच पण केंद्राकडून राज्याला मदत मिळवण्यासाठी फडणवीस यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल, अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली (Rohit Pawar hoped that a letter would be sent to the Center from Fadnavis).

केंद्राचा नियोजनाचा अभाव

अखंड जगावर कोरोनाचे संकट असताना देशात दिवसाला चार लाख कोरोना बाधित रुग्ण आढळून येत होते. अशा वेळी भारतात पश्चिम बंगाल, तामिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये निवडणुका सुरू होत्या. तसेच विविध कार्यक्रमात ठिकठिकाणी मोठी गर्दी होत होती. या सगळ्या गोष्टींमुळे देशवासियांना लसीची गरज असताना लसीचे उत्पादन वाढायला देश कमी पडला. या बाबतच्या चर्चा भारताबाहेर जेव्हा होऊ लागल्या, तेव्हा नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आला, अशी टीकाही रोहित पवारांनी (Rohit Pawar) केली.

देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा आहे. असे असताना केंद्र सरकारच्या मालकीची तामिळनाडू येथील लस निर्मिती कंपनी सध्या बंद अवस्थेत आहे. या कंपनीत महिन्याला 5 तर वर्षाला 60 कोटी लस उत्पादन करण्याची क्षमता आहे. लसीचा तुटवडा पाहता केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वय साधून सदर कंपनी सुरु करावी, असेही रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी