33 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeराजकीयसोनीया गांधींनी म्युकरमायकोसिस बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले पत्र

सोनीया गांधींनी म्युकरमायकोसिस बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले पत्र

टीम लय भारी

मुंबई :- देशात कोरोनाचे संकट असतानाच पुन्हा म्युकरमायकोसिस हे नविन संकट निर्माण झाले आहे. म्युकरमायकोसिस औषधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचसंदर्भात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्युकरमायकोसिस बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे (Congress President Sonia Gandhi has written a letter to Prime Minister Narendra Modi regarding mucormycosis).

या पत्रात सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी ‘म्युकरमायकोसिस’ (‘mucormycosis’) आजाराच्या औषध तुटवड्यावरून चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, म्युकरमायकोसिसचा (mucormycosis) प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी या आजाराचा सामना करण्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध केला जावा. तसेच, त्यांनी Liposomal Amphotericin-B च्या तुटवड्यावरून कारवाईची मागणी करत, अन्य आरोग्य विम्यांमध्ये म्युकरमायकोसिसला (mucormycosis) कवर करण्याची देखील विनंती केली आहे.

रोहित पवारांनी केंद्र सरकारला आर्थिक नियोजनाचा दिला सल्ला!

पश्चिम बंगाल लढवलं की मोदी रडतील, खासदाराची वाणी खरी ठरली

https://scroll.in/article/995424/the-myth-of-indian-exceptionalism-has-cost-the-country-dearly-during-the-pandemic

सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) म्हटले आहे की, “भारत सरकारने केवळ राज्यांना म्यूकरमायकोसिसला (mucormycosis) महामारी रोग अधिनियम अंतर्गत महामारी म्हणून घोषित करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ आहे की, याच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचे पुरसे उत्पादन होईल आणि या औषधांचा पुरवठा देखील सुनिश्चित केला जाईल. याचबरोबर उपचारासाठी रूग्णांना हे औषध मोफत उपलब्ध करून दिले जाईल.”

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) म्हणतात, “मी समजू शकते की त्यांनी Liposomal Amphotericin-B म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis)  उपचारासाठी आवश्यक औषध आहे. बाजारात याचा तुटवडा आहे. हा आजार आयुष्मान भारत व बहुतांश आरोग्य विम्यांमध्ये समाविष्ट नाही. त्यांनी पुढे लिहिले की, म्युकरमायकोसिसग्रस्त अनेक रूग्णांना दिलासा मिळावा यासाठी, मी तुमच्याकडे याप्रकरणी तत्काळ केली जाण्याची आग्रहपूर्वक मागणी करत आहे. ”

याचबरोबर, कोरोनामुळे जी मुले अनाथ झाली आहेत त्यांना नवोदय विद्यालयांमध्ये विनामूल्य शिक्षण द्यावे, अशी विनंती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी