35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यपालांनी भाजपच्या बहुमताची खात्री करावी, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया

राज्यपालांनी भाजपच्या बहुमताची खात्री करावी, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला निमंत्रण धाडण्याची भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. पण भाजपकडे बहुमत आहे का, याची खातरजमा राज्यपालांनी करायला हवी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. जी प्रक्रिया आता सुरु झाली ती अगोदर होवू शकत होती असेही नवाब मलिक म्हणाले.

घोडेबाजार सुरु होवू नये यासाठी राज्यपालांनी लक्ष दिले पाहिजे. भाजपाची सत्ता स्थापन झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पटलावर भाजपच्या विरोधात मतदान करेल. पटलावर सरकार पडल्यानंतर शिवसेनेने त्यांच्या विरोधात मतदान केले आणि पटलावर सरकार पडले तर पर्यायी सरकार निर्माण करण्याबाबत पक्ष विचार करु शकतो असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक येत्या १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत अशी माहितीही आमदार नवाब मलिक यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी